खबरकट्टा/चंद्रपूर :
किडनी मधून अर्धा किलोचा खडा निघाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रभाकर राऊत (55) यांच्या किडनी मधून ती तासाच्या शस्त्रक्रियेनंतर खडा काढला. जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी मधील घटना. किडनीस्टोनचा त्रास असल्याने रुग्णाला अतिवेदना होऊ लागल्या. कुटुंबियांनी त्याला लगेच ब्रह्मपुरीतील एका खाजगी रुग्णालयात हलवले. तीन तासांचा शस्त्रक्रियेनंतर तब्बल अर्धा किलो वजनाचा खडा बाहेर काढण्यात आला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी येथील प्रभाकर कारू राऊत (55) यांना किडनीस्टोनचा त्रास होता. # khabarkatta Chandrapur
अचानक त्यांच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. कुटुंबीयांनी त्यांना ब्रह्मपुरी शहरातील आस्था या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. प्राथमिक तपासनंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. डॉ. सुमित जयस्वाल यांनी तीन तासाचा यशस्वी शस्त्रक्रियेनंतर तब्बल अर्धा किलो वजनाचा खडा बाहेर काढला.