अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई; 16 तस्करांना अटक...#Action against illegal sand - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई; 16 तस्करांना अटक...#Action against illegal sand

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:


गडचिरोली: मागील वर्षभरापासून जिल्ह्यातील बहुतांश नदीघाटांवर अवैध वाळू तस्करी सुरू आहे. माध्यमांनी अनेकदा हे उघडकीस आणल्यानंतरही महसूल विभाग झोपेत होते. अखेर स्थानिक गुन्हे शाखेने आरमोरी तालुक्यातील खोब्रागडी नदीवर अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर कारवाई करीत 16 तस्करांना अटक केली आहे. यावेळी 3.40 कोटींचे साहित्य जप्त देखील करण्यात आले. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.#Gadchiroli

वाळू तस्करीविरोधात जिल्ह्याच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. आरमोरी तालुक्यातील खोब्रागडी नदी घाटावर मागील अनेक दिवसांपासून अवैधपणे वाळू उपसा सुरू होते. मोठ मोठ्या यंत्रांच्या साहाय्याने उपसा करून रात्रभरात अवजड वाहनातून येथील वाळू बाहेर पाठवण्यात येत होती. याबद्दल मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस विभागाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून मध्यरात्री या ठिकाणी धाड टाकली असता वाळू तस्करी सुरू असल्याचे आढळून आहे. यावेळी तब्बल 16 तस्करांना ताब्यात घेण्यात आले. सोबतच तस्करीत वापरले जाणारे 3.40 कोटींचे वाहने देखील जप्त करण्यात आले.

अलीकडच्या काळातील वाळू तस्करांविरोधात ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजार केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात करण्यात आली.#khabar katta

महसूल विभागाचा ‘आशीर्वाद’?

जिल्ह्यातील घाटांचे लिलाव झालेले नाही. केवळ नदी काठावरील शेतात साचलेली वाळू वाहून नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. याचा फायदा घेत तस्कर थेट नदीतील वाळू उपसा करून इतर जिल्ह्यात पाठवीत आहेत. आरमोरी येथील कारवाईत अटक करण्यात आलेले तस्कर बाहेर जिल्ह्यातील आहे. महसूल विभागाच्या आशीर्वादाने हा सर्व प्रकार सर्रास सुरू असल्याचे चित्र आहे.#chandrapur


Pages