शंकरपटाच्या नावाखाली लाखोचा झेंडीमुंडीचा खेळ-प्रशासनाचे दुर्लक्ष - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



शंकरपटाच्या नावाखाली लाखोचा झेंडीमुंडीचा खेळ-प्रशासनाचे दुर्लक्ष

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

चिमुर तालुक्यातील ताडोबा बफर झोनला लागुन असलेल्या मासळ जवळील देवरी येथे शंकरपटात झेंडीमुंडीचा गोरखधंदा सुरू असुन लाखो रुपयाचा अवैध धंदा सुरू आहे तरीही याकडे मात्र तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांचे मुळीच लक्ष नाही.#khabarkatta

देवरी येथे बऱ्याच दीवसापासुन शंकरपट सुरू आहे .शंकरपट म्हटलंकी शेतकऱ्यांचे मनोरंजनाचे साधन खाली पिरेड शेती हंगामाचे कामे आटोपल्यावर शेतकरी हा रिकामा होतो आणि या रिकाम्या पिरेडमध्ये शेतकऱ्यांच्या बैलांचा मेळावा भरवुन शेतकऱ्यांचे मनोरंजन व्हावे हा या मागील मुळ उद्देश आहे मात्र येथे चित्र उलट पाहायला मिळत आहे.#chimur

दररोज शंकरपटाच्या नावाने चार - पाच गट मीळुन पाच अशा झेंडीमुडी लावुन लाखो रूपयाचा सट्टा येथे चालू आहे . 28 मार्च पर्यंत येथे शंकरपट चालू आहे .गृह वीभागाच्या आशीर्वादाने येथे झेंडीमुडी चालू आहे . हा झेंडीमुडीचा खेळ म्हणजे एक पडदी असते .त्यावर सहा घरे असतात .वीट - बदाम , झेंडा - मुंडा , झीळी - अस्मान हे घरे त्या पडदीवर असतात . सहा खडंगे या घरांचे असतो . 1000 चे दोन हजार एक घराचे दोन घरे आल्यावर 1000 चे 2000 देत असतात . हे झेंडीमुंडी धारक पट कमेटीच्या लोकांना दररोज एका झेंडीमुंडी वाल्याकडुन दररोज झेंडीमुंडी लावण्यासाठी घेत असतात .अशा पाच चमूकडुन 25000 रूपये कमेटी घेत असल्याचे बोलल्या जात आहे . ह्या खेळामूळे दररोज लाखो रूपये नागरीकडुन लुटल्या जात . या सर्व प्रकाराची पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांनी दखल घेवून हा सट्टा बंद करावा अशी मागणी सुज्ञ नागरीकांचा मागणी होत आहे .#chandrapur

Pages