प्रतिष्ठित व्यापाऱ्यावर केला प्राणघातक हल्ला...#Assault on a reputed businessman - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



प्रतिष्ठित व्यापाऱ्यावर केला प्राणघातक हल्ला...#Assault on a reputed businessman

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

सिंदेवाही येथील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्यावर काही जणांनी प्राणघातक हल्ला केला. सुदैवाने यात ते बचावले. मात्र जखमीही झाले. या घटनेतील अनोळखी आरोपी घटनेनंतर फरार झाले असून पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास घडली.#khabar katta 

प्रकाश वासुदेव समर्थ असे व्यापाऱ्याचे नाव असून ते समर्थ मशिनरीज अँड इलेक्ट्रॉनिक या दुकानाचे मालक आहेत. प्रकाश वासुदेव समर्थ हे आपले दुकान बंद करून दुचाकीने (एमएच-34- बीएस- 4451) घरी जात असताना प्रभाग क्रमांक 1 मधील स्टेट बँकेच्या मागे कॉलनीतील भागात रस्त्यावर एक अनोळखी व्यक्ती संशयास्पद उभा असताना त्यांना दिसला.#chandrapur 

कामानिमित्त जात असल्याचे त्याने सांगितले. नागदेवते हे प्रकाश समर्थ यांच्या घराशेजारी राहतात. समर्थ दुचाकीने समोर काही अंतर गेल्यानंतर त्या अनोळखी व्यक्तीने शिट्टी वाजविली. शिट्टी वाजवताच रस्त्याच्या एका बाजूला झाडाला लोखंडी तारे बांधून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तार घेऊन दुसरा अनोळखी व्यक्ती अंधारात बसून होता. शिट्टीचा आवाज जाताच त्याने तार जोराने ताणून धरला.

प्रकाश समर्थ यांच्या गळ्याला फास लागावा, हा आरोपींचा हेतू होता. मात्र समर्थ हे वाकले व वाकूनच दुचाकी गाडीला काढण्याचा प्रयत्न केला. परंतु थोडासा उजव्या गालावर तार घासल्याने ते जखमी झाले. त्यानंतर अज्ञात आरोपी पळून गेले आहे. हा हल्ला वैमनस्यातून झाला की पैसे लुटण्यासाठी, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सिंदेवाही पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात भादंवि कलम 34,394 गुन्हा दाखल केला आहे.#khabar katta 

Pages