मध्यरात्री सागाची तस्करी करणाऱ्यांनी वनकर्मचाऱ्यांवर केला दगडांचा वर्षाव...#Teak smugglers pelted stones on the forest personnel in the middle of the night - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



मध्यरात्री सागाची तस्करी करणाऱ्यांनी वनकर्मचाऱ्यांवर केला दगडांचा वर्षाव...#Teak smugglers pelted stones on the forest personnel in the middle of the night

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

सिरोंचा (गडचिरोली) : मध्यरात्री सागाची तस्करी करणाऱ्यांनी गस्तीवरील वनकर्मचाऱ्यांवर दगडांचा वर्षाव केला. प्रत्युत्तरात वनकर्मचाऱ्यांनी हवेत गोळीबार केल्यावर तस्करांनी बैलगाड्या जागीच सोडून पोबारा केला. सिरोंचा वनपरिक्षेत्रातील चिटूर ते दुब्बापल्ली जंगलात हा थरार झाला.#khabarkatta

सिरोंचा वनपरिक्षेत्रातील अधिकारी, वनकर्मचारी व आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी संयुक्त गस्त घालत होते. दुब्बापल्ली जंगलात कर्मचारी पाळत ठेवून असताना 24 मार्च रोजी मध्यरात्री एक वाजता सागतस्कर बैलबंडीमध्ये साग लठ्ठे भरुन येत असल्याचे दिसले. तेव्हा त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता सागतस्करांनी वनकर्मचाऱ्यांवर दंगडांचा मारा करीत हल्ला केला. साग तस्करांना पांगविण्यासाठी वनाधिकाऱ्यांनी पिस्तलमधून हवेत गोळीबार केला. यावेळी सागतस्कर बैल व बंड्या सोडून अंधाराचा फायदा घेत जंगलात पसार झाले.#chandrapur

सिरोंचा वनविभागाच्या उपवनसंरक्षक पूनम पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षे अधिकारी पी.एम.पाझारे, आर.डी. तोकला, वनपाल एम.बी.शेख, एस.एस. नीलम, वनरक्षक आर. के. शेरकी, ए. एस. नैताम, आर. वाय. तलांडी, पी.टी. दर्रो, एम. जे. धुर्वे, वाहनचालक आर. बी. आत्राम, ए. जी. आत्राम तसेच आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील वनरक्षक आर. पी. गेडाम, ए.डब्ल्यू. तलांडी, सी. पी. दुर्गे तसेच रोजंदारी वनमजूरांनी पार पाडली.

अधिकाऱ्यांनी काढली रात्र जागून घटनास्थळावरुन 14 बैल, 7 बैलगाड्या व सागाची 31 लाकडे असा मुद्देमाल जप्त केला. मध्यरात्री एक वाजेपासून पहाटे चार वाजेपर्यंत वनाधिकाऱ्यांनी रात्री डेपोमध्ये हलविण्यात आला असुन पुढील कार्यवाही जागून काढत ही कारवाई केली. जप्त केलेला मालवनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम. पाझारे हे करीत आहेत.

Pages