भारतीय सैन्य दलामध्ये महाराष्ट्र राज्यातील नवयुवकांचे एक सैनिक म्हणून सर्वात जास्त योगदान आहे. सैन्य भरती कार्यालय, नागपूर यांच्यामार्फत सैन्य भरतीच्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील नवयुवकांसाठी दि. 5 ते 11 जुलै 2023 या कालावधीत बुलढाणा जिल्हा वगळता विदर्भातील 10 जिल्ह्यांकरिता अग्निवीर रॅली आयोजित करण्यात आली आहे. तत्पुर्वी 17 एप्रिल 2023 रोजी प्रवेश पात्रता परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे.#khabarकट्टा
भरतीस इच्छुक उमेदवारांनी सैन्य भरतीच्या अटी, नियम, पात्रता व आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे तसेच इतर आवश्यक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटला भेट द्यावी. तसेच स्वतःचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे. ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख 15 मार्च 2023 आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन नंतर मिळणाऱ्या हॉलतिकीट शिवाय कोणत्याही उमेदवारास सैन्य भरतीच्या मैदानात प्रवेश मिळणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी सैन्य भरती कार्यालय, नागपूर यांच्या 0712-2558020 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, डायरेक्टर (रिक्रुटींग) आर. जगत नारायण यांनी कळविले आहे.#Agniveer Military Recruitment Rally