तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस तर्फे "हाथ से हाथ जोडो अभीयान...#"Haath Se Haath Jodo Abhiyan" by Taluka Congress and City Congress - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस तर्फे "हाथ से हाथ जोडो अभीयान...#"Haath Se Haath Jodo Abhiyan" by Taluka Congress and City Congress

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:


चिमूर येथे तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस कमीटी तर्फे डॉ. सतीश वारजुकर यांच्या नेतृत्वात ९ मार्चला "हाथ से हाथ जोडो ,अभीयान चिमूर येथे राबवीण्यात आला.

यावेळी डॉ. नामदेव किरसान महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस यांनी मार्गदर्शन करतांना केंद्रातील मोदी सरकारणी जनतेला कश्या प्रकारे लुटत आहे अदानी, अंबानी अश्या मोठया उद्योग पतींचे घर भरण्याचं काम केंद्र सरकार करीत आहे गोर गरीब बांधवाना लुटण्याचं काम सुद्धा ही सरकार करीत आहे गॅस दर वाढ , घर गुती अण्णा वर सुद्धा यांनी टॅक्स लावण्याचे काम मोदी करीत आहे. जनतेनी यांना आता धडा शिकवणे गरजेचं आहे तरी सर्व जनतेनी "हाथ से हाथ जोडो " अभियानात सहभागी व्हावे असे सुद्धा आव्हान डॉ किरसान यांनी केले.#khabarkatta

अमेरीकेतील संस्थेच्या अहवालाने अदानी उद्योग समूहातील महाघोटाळा उघड झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकार अदानी उद्योगावर मेहरबान असल्याचे उघड झालेले आहे देशातील जनतेचा एस,बी,आय सारख्या सार्वजनिक संस्थेमधील कष्टाचा पैसा मोदी सरकारने अदानी समूहाला बेकायदेशीरपणे गुंतवला त्यामुळे कोट्यावधी गरीब आणि आणि मध्यमवर्गीय भारतीयांची करोडो रुपयांची बचत व गुंतवणूक धोक्यात आली आहे या करिता मोदी अदानी महाघोटाळ्याची पोल खोलण्यासाठी व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया चिमूर यांना वरिष्ठ स्तरावर पोहोचवून भारतीयांची करोडो रुपयांची बचत व गुंतवणुकीला झालेला धोका टाळावा व ठेव सुरक्षित ठेवावी यासाठी 74 चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर डॉ. सतीश भाऊ वारजूकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले,या वेळी संपूर्ण कांग्रेस.khabarkatta chandrapur 

या "हाथ से हाथ जोडो " अभियानात तालुका अध्यक्ष कॉग्रेस विजुभाऊ गावंडे , शहर कॉग्रेस अध्यक्ष अविनाश अगडे,राम राऊत स संजय भाऊ डोंगरे , कापसे , शिंगरे ,दीपक कुंभारे, विजय डाबरे , सविता चौधरी , भावना ताई बावनकर अंसख्य कॉग्रेस कार्यकर्ते मोर्च्यात सहभागी होते .सर्वाणि जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ विजय गावंडे पाटील उपस्थीत होते .#"Haath Se Haath Jodo Abhiyan"

"हाथ से हाथ जोड़ो" अभियानाचे आयोजन अध्यक्ष तालुका कांग्रेस कमिटी, चिमुर अध्यक्ष शहर कांग्रेस कमिटी,अध्यक्ष तालुका काँग्रेस पर्यावरण विभाग, चिमुर, अध्यक्ष तालुका काँग्रेस ओबीसी सेल चिमुर, अध्यक्ष महिला कांग्रेस कमिटी, चिमुर शहर कांग्रेस कमिटी, तालुका महिला काँग्रेस कमिटी, शहर महिला काँग्रेस कमेटी, तथा सर्व फ्रण्टल आर्गनाइजेशन यांनी केले होते.या हाथ से हाथ जोडो अभीयानाला दुपारी ठीक 3 वाजता डॉ. सतिष वारजुकर यांच्या जनसंपर्क कार्यालयापासुन सुरू होउन समारोप तालुका काँग्रेस कार्यालय चिमूर येथे करण्यात आला.


Pages