खबरकट्टा/चंद्रपूर:
चिमूर उपवीभागीय पोलीस वीभागाच्या मीळालेल्या माहीती नुसार नेरी येथील आरोपी सुनील शंकर पीसे ( 34 ) वर्ष हा सकाळी नेरी येथीलच एका महीलेच्या घरी जाऊन त्या महीलेला अश्लील शब्दात बोलला .ती घरून बाहेर आली असता रस्त्यावर सुध्दा हेच वर्तन महीलेसोबत केल्यामुळे त्या महीलेने चिमूर पोलीस स्टेशन गाठून आरोपी सुनील पीसे यांच्या वीरूध्द तक्रार दाखल केली . चिमूर पोलीस यांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली.
आरोपीवर अनुसुचित जाती जमाती 2015 कायद्यानुसार कलम 354 , 294 , 506 , 447 , भादंवी सहकलम 3 (1)(8 )(s) ३(२)(VA) गुन्हे दाखल करून अटक करून जील्हा कारागृह चंद्रपुर येथे आरोपीची रवानगी करण्यात आली .#khabarkatta
वरोऱ्याचे (आय .पी.एस .) सहाय्यक पोलीस अधीक्षक आयुष नोपानी हे स्वत: या प्रकरणाचा तपास करीत आहेत तसेच चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज गभणे तसेच उपवीभागीय पोलीस वीभाग चिमूरचे हेड कॉन्स्टेबल चाफले हे सुध्दा या तपासात मदतीला आहेत .