श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवा अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने आझाद बागेत चला आठवणीच्या गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत महिलांसाठी 17 जुने पारंपारिक खेळ घेतल्या गेले. बालपणीच्या या खेळांमध्ये महिला चांगल्याच रमल्या. जवळपास तिन हजार महिलांनी या खेळात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला किशोर जोरगेवार, कल्याणी जोरगेवार, भावना पालीवाल, डॉक्टर नियाज खान, ममता मुंदडा, राजश्री गौरकार, वंदना हातगावकर यांच्यासह इतर माण्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने श्री माता महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात विशेष महिलांसाठी 17 जुन्या पारंपारिक खेळांचे आयोजन आझाद बागेत घेण्यात आले. यात मामाच पत्र हरपल, लगोरी, लिंबु चम्मच, संगीत खुर्ची, रस्सा खेच, लंगडी, पिंकी पिंकी व्हाट कलर, साखळी खेळ, फुगडी, बेडुक उडी, तीन पायाची लंगडी, टोपी संगीत खेळ, पोता उडी, बटाटा रेस, तळ्यात - मळ्यात, चिकट मासा आदी खेळांचा समावेश करण्यात आला होता. आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन आयोजित या खेळांना महिलांंचाही उत्स्फृत प्रतिसाद मिळाला.
यात जवळपास तिन हजार महिलांनी सहभाग घेत हरविलेल्या जुन्या खेळांचा मनसोक्त आनंद घेतला. महिला संसार सांभाळत असतांना स्वतासाठी जगत नाही. त्यामुळे एक दिवस त्यांनी स्वतःसाठी जगत बालपणीच्या आनंददायी आठवणीत जगावे, त्यांच धाडस वाढाव या हेतुने आपण चला आठवणीच्या गावात ही संकल्पना सुरु केली आहे. यात आम्हाला महिलांचा अप्रतिम प्रसिसाद लाभला आहे.
दरवर्षी आपण आता या याचे आयोजन करणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या स्पर्धांमध्ये आमदार किशोर जोरगेवार यांच्या पत्नी कल्याणी किशोर जोरगेवार यांनीही सहभाग घेतला होता. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षित पुरस्कार देत सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्र - संचालन सरोज चांदेकर, प्रज्ञा जीवनकर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीने अथक परिश्रम घेतले.
Under the Shree Mata Mahakali Sports Festival, a program was organized by MLA Kishore Jorgewar in Azad garden "Chala Thamni village". 17 old traditional games for women were conducted under this. Women enjoyed these childhood games well. About 3000 women participated in this game. Kishore Jorgewar, Kalyani Jorgewar, Bhavna Paliwal, Doctor Niaz Khan, Mamta Mundada, Rajshree Gaurkar, Vandana Hatgaonkar and other dignitaries were present on the stage.
Shree Mata Mahakali Mahotsav was organized on behalf of MLA Kishore Jorgewar. 17 old traditional games for special women were organized in Azad Bagh. It includes Mamach Patra Harpal, Lagori, Lemon Spoon, Musical Chair, Rassa Khech, Langdi, Pinky Pinky White Color, Chain Game, Balloon, Frog Jump, Three Legged Limb, Topi Music Game, Pota Udi, Potato Race, Pond - Plantation, Sticky Games like fish were included.Organized by MLA Kishore Jorgewar, these games also received enthusiastic response from women.
Nearly 3000 women participated in this and enjoyed the lost old games heartily. A woman does not live for herself while taking care of the world. So one day they should live for themselves in the pleasant memory of their childhood, we have started this concept in the village of memories to increase their courage. In this we have got amazing support from women.
On this occasion MLA Kishore Jorgewar said that he will organize this event every year. MLA Kishore Jorgewar's wife Kalyani Kishore Jorgewar also participated in these competitions. The winners of the competition were felicitated with attractive awards by dignitaries. The program was moderated by Saroj Chandekar, Pragya Jeevankar while the Mahila Aghadi of Young Chanda Brigade worked tirelessly for the success of the program.