खबरकट्टा/चंद्रपूर:
आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. तसेच आपले कार्यालय व कार्यालयाचा परिसर स्वच्छ व सुंदर दिसावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात सुरुवातीला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविन्यात आली. तर आता सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम. यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चंद्रपूर प्रशासकीय भवन परिसरात श्रमदान करून परिसर स्वच्छ केला.
प्रशासकीय भवन येथे विविध कार्यालय आहेत. या कार्यालयात दैनंदिन शासकीय कामकाजाच्या निमित्ताने नागरिकांची व अभ्यागंताची सतत येजा सुरू असते. त्यांना या परिसरात आल्यावर स्वच्छ व प्रसन्न वाटावे, या उद्देशाने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम. यांच्या पुढाकारातून श्रमदान करण्यात आले. तसेच इतरही कार्यालयांनी आपल्या कार्यालयाचा परिसर स्वच्छ केला. या श्रमदानात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.यावेळी प्रकल्प अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयाचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते, भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक प्रमोद घाडगे यांच्यासह प्रशासकीय भवन येथील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
It is our moral responsibility to keep our surroundings clean. Also, with the aim of making our office and office area clean and beautiful, under the leadership of Collector Vinay Gowda, a cleanliness campaign was initially implemented in the area of the Collectorate. Now Assistant Collector and Project Officer Muruganantham M. He along with other officers and employees cleaned the area by donating labor in Chandrapur Administrative Building area.
There are various offices in the administrative building
Citizens and visitors are constantly coming to this office on the occasion of daily government work. To make them feel clean and happy when they come to this area, Assistant Collector and Project Officer Muruganantham M. Labor was donated through his initiative. Other offices also cleaned their office premises. Officials and employees participated spontaneously in this labor donation. On this occasion, the project officers appealed to keep the area of their office clean and beautiful.
On this occasion, Assistant Commissioner of Food and Drug Administration Department Nitin Mohite, District Superintendent of Land Records Pramod Ghadge along with officers and employees of various offices of the Administrative Building were present.