धक्कादायक; शिक्षक संस्थाचालकाकडे मागितली 25 लाखांची खंडणी...#A ransom of twenty five lakhs was demanded from the director of the educational institution - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



धक्कादायक; शिक्षक संस्थाचालकाकडे मागितली 25 लाखांची खंडणी...#A ransom of twenty five lakhs was demanded from the director of the educational institution

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
वर्धा : एखाद्या बिल्डरला मागावी अशी खंडणी एका संस्थाचालकास मागितल्याची घडामोड आहे. येळकेळी येथे नामांकित शाळा संचालित करणाऱ्या दिनेश चांनावार यांना गावातीलच देवानंद बारहाते याने संस्थेत उपसंचालक करण्याची मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्यास विनयभंग व बलात्काराच्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिली. यात मध्यस्थ म्हणून मंगेश विठ्ठलराव चोरे याने हस्तक्षेप केला.#khabarkatta

त्याने पंचवीस लाख रुपयांची मागणी चांनावार यांच्याकडे केली. यापैकी तीन लाख रुपये रोख व पंधरा लाख रुपयांचा कोरा धनादेश आरोपी चोरे याच्या नेरी येथील घरी दिल्याचे सावंगी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर चोरे व बाराहाते यांच्या विरोधात विविध गुन्हे दाखल झाले. विशेष म्हणजे, चोरे हा खंडणीच्या अन्य प्रकरणात गजाआड आहे. तसेच अन्य गुन्हे दाखल असल्याने विविध पोलीस ठाणे त्याला ताब्यात घेऊन चौकशी करीत आहे. पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर पिळल्या गेलेले अनेक तक्रारी दाखल करीत आहेत.# Chandrapur

Khabarkatta/Chandrapur:

It is a matter of demanding extortion from a builder. Dinesh Channawar, who runs a renowned school in Yelkeli, was asked by Devanand Barhate of the village to make him the deputy director of the institution. If the demand is not accepted, he threatened to be involved in the case of molestation and rape. Mangesh Vitthalrao Chore intervened as a mediator. #khabarkatta 

He demanded twenty five lakh rupees from Channawar. Out of this, three lakh rupees in cash and a blank check of rupees fifteen lakhs were given to the house of the accused thief in Neri, it is stated in the complaint given to the Savangi police. After the complaint was filed, various cases were registered against the thieves and barahates. Notably, Chore is a scapegoat in another case of extortion. Also, as other crimes have been registered, various police stations are detaining him and interrogating him. After the appeal by the police, many people who were squeezed are filing complaints.

Pages