खबरकट्टा/चंद्रपूर:
गडचिरोली जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली पंदिलवार यांचे पती व जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय पंदीलवार यांनी आज दि.25/01/2023 ला भाजपात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी गडचिरोली येथे आले असता त्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला.
संजय पंदीलवार हे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक मानले जात होते. आता कांग्रेस जिल्हा महिला काँगेस अध्यक्ष रुपाली पंदीलवार यांच्यावर कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
