खबरकट्टा/चंद्रपूर:
गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय भद्रावती येथे प्रजासत्ताक दिनाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि आम आदमी पार्टी भद्रावती च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कार्यक्रमात आमंत्रीत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आम आदमी पार्टीचे शहर उपाध्यक्ष आशिष भाऊ तांडेकर व प्रमुख पाहुणे म्हणून सुरज भाऊ शहा उपस्थित होते. शहर उपाध्यक्ष आशिष भाऊ तांडेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले व सुरज भाऊ शहा यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले.
त्यानंतर उपाध्यक्ष आशिष भाऊ तांडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडण्यात आला. ध्वजारोहणा कार्यक्रमा नंतर विद्यालयात आम आदमी पार्टीच्या माध्यमातून दोन वेळेस चे जेवण विद्यालयातील मुलांना उपलब्ध करून देण्यासाठी पार्टीच्या कार्यकर्त्यांचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यालयाचे संस्थापक पाचपोर साहेब यांनी आम आदमी पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आभार व्यक्त केले तसेच इतर शिक्षक मंडळी कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी आम आदमी पार्टी भद्रावतीच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त चॉकलेट व बिस्कीट वाटप करून मुलांचे तोंड गोड करण्यात आले. त्यानंतर पारधी सर यांनी आभार प्रदर्शन केले आणि कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.
यावेळी तालुका सचिव सुमीत हस्तक, सुरज भाऊ शहा, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर सचिव विजयभाऊ सपकाळ, शहर संघटन मंत्री अनिलकुमार राम, शहर कोषाध्यक्ष सरताज भाऊ शेख, मंगेश भाऊ खंडाळे, केशवभाऊ पचारे, श्यामभाऊ पिंपळकर, नितीन भाऊ देवगड़े, रितेश नगराळे, राजेश भाऊ नरवडे, बाळूभाऊ बांदुरकर, प्रदीप भाऊ लोखंडे, चेतन भाऊ खोब्रागडे, संजय भाऊ सातपुते, डोरी भाऊ स्वामी, घनश्याम भाऊ गेडाम, विनोद भाऊ लांडगे, राजू भाऊ कोड़ापे, अतुल रोडगे, शुभम रामटेके, शुभम भोस्कर, विकी मुळेवार, दिलीप कापकर, सुभाष कोडापे, सचिन मुरसकर, अनिल कोकुडे, गौरव चांदेकर, बाळकृष्ण पिंपळकर, आनंद पुसाटे व इतर कार्यकर्ते उपस्थीत होते.

