ताडोब्यात म्युझिकल धिंगाणा करणे पडले महागात; वनविभागाची कडक करवाई - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



ताडोब्यात म्युझिकल धिंगाणा करणे पडले महागात; वनविभागाची कडक करवाई

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर:


ताडोबाच्या बफर क्षेत्रात रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून गाणे वाजवून पार्टी करणे परराज्यातील पर्यटकांना चांगलेच महागात पडले. या घटनेत वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली (बफर) संतोष थिपे यांनी अन्य राज्यातून आलेल्या वाहन चालकांकडून 5000 रुपये दंड वसूल करून लगेच जंगलाबाहेरचा रस्ता दाखविला.

जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली पद्मापुर मार्गाने जात असताना परराज्यातील पर्यटकांच्या दोन चारचाकी गाड्या ताडोबा बफर सफारीच्या रस्त्याखाली उतरून मोठ्याने गाणे लावून पार्टी करत असल्याचे तेथिल स्थानिक वन मजूर राजू चिरकाम यांना लक्षात आले. त्यांनी मोहर्ली वनपरिक्षेत्र कार्यालयास माहिती दिली.

माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. ज्या परिसरात भरदिवसा वाघ रस्त्याने चालताना दिसतो. अशा या संवेदनशील परिसरात गाडी खाली उतरून गाणे लावून पार्टी सुरू होती. याप्रकरणी राघवेंद्र दुबे(उत्तर प्रदेश ), किरण इंगोले(पुणे),अनंत (तामिळनाडू ),संतू राऊत(मिर्झापूर ), राकेश राठी (हरियाणा ), रविकुमार (बिहार ), मोरेश्वर मराठे (झारखंड ),संघरत्न जिवतोडे (नांदेड-महाराष्ट्र ), आदित्य मिश्रा (दिल्ली ), डॅनिअल प्रभाकरण (तामिळनाडू ) यांना हजार रुपये दंड आकारून त्या पर्यटकांना जंगलाबाहेर काढले.


Pages