खबरकट्टा/चंद्रपूर:
मागील काही दिवसांमध्ये घटस्फोट घेणान्यांची संख्या वाढली आहे. जीवन जगण्याची पद्धती यासाठी धोकादायक ठरत आहे. घटस्फोटामुळे स्वत:चे करिअर खराब होते, मुलांचे भविष्य अंधकारमय होते. त्यामुळे घटस्फोटाचा घटना थांबवून विवाह संस्था वाचविणे काळाजी गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
भारतीय परिवार बचाव संघटना चंद्रपूरतर्फे 'भारतीय संस्कृती व घटस्फोटाची दाहकता' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुभाष नरुले, जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर, सचिन बरबटकर, गंगाधर गुरणुले सुदर्शन नैताम, मोहन जीवतोडे, भलमे, मुन, दुर्गे, अक्केवार, गोविंदवार, करमरकर, ताटे, गावंडे, चांदेकर, रफिक शेख,मोहब्बत खान आदी उपस्थित होते
घटस्फोटामध्ये महत्त्वाची भूमिका मोबाइलच्या अतिवापर असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. पती- पत्नीमध्ये संवाद कमी होत चालला आहे. पतीच्या वृद्ध माता-पित्यांना घरात राहण्यास मनाई करणे, वृद्धाश्रमात पाठविणे, पतीच्या नातेवाइकांचा अपमान करणे आदी कारणेही विवाह विच्छेद होत आहे.
पवित्र बंधन टिकून ठेवणे महत्त्वाचे...जगात भारतीय संस्कृती श्रेष्ठ मानल्या जाते; परंतु, भारतीयांनी पश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करणे सुरू केले आहे.घटस्फोट हा संस्कृतीला लागलेला कलंक आहे. त्यामुळे विवाह संस्था धोक्यात येत आहे. लग्न हे पवित्र बंधन मानले जाते कोणत्याही कठीण परिस्थितीत विवाह बंधन टिकवून ठेवण्यासाठी अनेकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र, आता यासाठी जनजागृती करणे गरजेचे असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले
