खबरकट्टा/चंद्रपूर:
देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी एलआयसीमध्ये मोठी भरती निघाली आहे. अप्रेंटिस डेवलपमेंट ऑफिसरची सव्वा नऊ हजार पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवार एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकणार आहेत. अर्ज कसा करावा, अखेरची तारीख आदी माहिती देण्यात आली आहे.
महत्वाची तारीख
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख 21 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी, शैक्षणिक पात्रतेचा तपशील भरती अधिसूचनेत दिलेला आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भरती अधिसूचना पहावी.
वय मर्यादा
सर्व अर्जदार उमेदवारांची वयोमर्यादा २१ वर्षे ते ३० वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
अर्ज शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 750 रुपये भरावे लागतील, तर SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये भरावे लागतील.
निवड प्रक्रिया
LIC च्या या पदावर निवड होण्यासाठी, उमेदवारांना ऑनलाइन चाचणी आणि मुलाखतीच्या प्रक्रियेतून जावे लागेल. शॉर्टलिस्ट केल्यानंतर उमेदवारांना प्री-रिक्रूटमेंट मेडिकल टेस्टच्या प्रक्रियेतून जावे लागेल.
