अल्ट्राटेक वसाहतीतील डबक्यात 3 मुले बुडाली? डबक्याजवळ आढळले कपडे - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



अल्ट्राटेक वसाहतीतील डबक्यात 3 मुले बुडाली? डबक्याजवळ आढळले कपडे

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -

अल्ट्राटेक कंपनी वसाहतीतील शाळेत शिकणारी समवयस्क अंदाजे 12 वर्षाची तीन मुले सायंकाळपर्यंत घरी परतली नव्हती.अल्ट्राटेक कंपनीने तयार केलेल्या डबक्यात तीन शाळकरी मुळे बुडाल्याच्या संशयावरून गुरुवारी सायंकाळी 6 वाजतापासून शोध मोहीम राबवली. डबक्याजवळ मुलांचे कपडे आढळल्याने संशय बळावला आहे.

अल्ट्राटेक कंपनी वसाहतीतील शाळेत शिकणारी समवयस्क अंदाजे 12 वर्षाची तीन मुले सायंकाळपर्यंत घरी परतली नाही. अश्यातच सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास अल्ट्राटेक कंपनीने तयार केलेल्या डबक्याजवळ मुलांचे कपडे आढळून आले. यावरून ही मुले डबक्याच्या पाण्यात पोहण्यासाठी गेली असावी. खोल पाण्यात गेल्यामुळे ती बुडाली असावी, असा अंदाज घेऊन कंपनी व्यवस्थापन व गडचांदूर पोलिसांनी शोध सुरू केला आहे. मात्र, काहीही शोध लागला नाही. अखेर अंधारामुळे शोध मोहीम थांबविन्यात आली होती.आज सकाळी शोधमोहीम सूरू करण्यात आली.

आज शुक्रवारी सकाळी तीनही मुलांचे मृतदेह आढळले. ही मुले डबक्याच्या पाण्यात पोहण्यासाठी गेली असावी. खोल पाण्यात गेल्यामुळे ती बुडाली असावी असा अंदाज आहे.

दर्शन शंकर बशाशंकर, पारस सचिन गोवारदिपे व अर्जुन सुनील सिंग तिघांचेही वय 10 वर्ष. रा. अल्ट्राटेक कंपनी वसाहत अशी डबक्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. आदित्य बिराला पब्लिक स्कूल, आवाळपूर अल्ट्राटेक वसाहतीतील शाळेत 4थ्या वर्गात शिकत होते.

Pages