खबरकट्टा/ चंद्रपूर:
कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत वनोजा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ नागरिकांनाचा सत्कार सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वनोजा गावाच्या विकास करण्यासाठी सरपंच दिलीप पाचभाई नेहमीच पुढाकार घेत शासनाच्या योजना गावातील प्रत्येक नागरिकांन पर्यत पोहचविन्याचे काम करण्याचा त्यांच्या नेहमीच प्रयत्न असतो.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दिलीप पाचभाई तर प्रमुख पाहुणे म्हणून दालमिया सिमेंट कंपनीचे अधिकारी रायडू साहेब. भीमनवर साहेब.अॅड देवा पाचभाई विदर्भ अध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद. सौं सोनी भोयर उपसरपंच. सातपुते सर मुख्यध्यापक. बोधे सर ग्रामसेवक.सुमित ढवस सामाजिक कार्यकर्ते. लविना हेकड.पौर्णिमा चुनारकर. सचिन लोहे. सुनील पिंपळशेंडे. सौं सुनंदा वऱ्हाटे. प्रवीण हेकड. संदीप पंधरे. सौं हर्षकला मत्ते. सौं छाया पेटकर. सौं विमल वेट्टी व गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.

