राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन जवळ छत्तीसगड राज्यातून बेमेत्रा जिल्ह्यातील तालुका नावागळ येथून हैदराबाद मजूर घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स रात्री 2:30 वाजताच्या दरम्यान विरूर ते धानोराच्या मधात पालटल्याची घटना घडली असून ट्रॅव्हल्स खाली दबून रात्रीच एका मजुराचा मृत्यू झाला तर्हो दुसरा गंभीर जखमी अवस्थेत असताना मृत पावला तर् एकूण 37प्रवास्यांपैकी 17ते 18 जखमी आहेत.त्यापैकी काहींना उपजिल्हा रुग्णालय राजूरा, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर इथे भरती करण्यात आले आहे.
सदर ट्रॅव्हल्स रायपूर येथील कंपनीची असून अवैधरित्या मजूरांची ये जा करण्याकरिता प्रसिद्ध असल्याचे कळते. ही ट्रॅव्हल्स रायपूर येथून 27तारखेला सकाळी रायपूर येथून सुटली व हैद्राबाद येथे आज सकाळी 11वाजताच्या च्या दरम्यान पोहोचण्याचे ठिकाण होते. चंद्रपूर जिल्ह्यातून वाहतूक करताना महाराष्ट्र -तेलंगणा सीमेवरील नाका चुकविण्याच्या हेतूने राजुरा येथून असिफबाद रोडने सरळ मार्गे न जाता माणिकगड वरून मूर्ती-धानोरा-स्टेशन विरूर ते तेलंगणा अश्या आडमार्गाने जात असताना एकेरी रस्त्यावर समोररून येणाऱ्या हायवा ट्रक ला रस्ता देण्याच्या हेतूने रोड सोडून खाली उतरताच उलटून पडली.
ही घटना आज सकाळी पहाटे 2:30वाजताच्या दरम्यान घडली असता सदर गाडीच्या चालकाने बल्लापूर येथील खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीला कॉल करताच त्यांनी टीम खबरकट्टा ला माहिती देत मदत मागितली असता टीम खबरकट्टा ने तात्काळ राजुरा व विरूर स्टेशन पोलीस स्टेशन ला माहिती दिल्याने पोलीस चमू घटनास्थळी दाखल झाल्या व इतरांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. तरीही अवैध वाहतूक व मानवीय सुरक्षेचा प्रश्न कायमच राहतो.



