हरवलेली महिला आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



हरवलेली महिला आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर:
पोलिस स्टेशन, पडोली येथे अजय विजय आवळे रा. येरुर, ता. चंद्रपूर यांच्या तोंडी रिपोर्टवरुन त्याची आई संगिता विजय आवळे वय 39 वर्ष रा. येरुर, या दि. 30 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान कोणालाही काही न सांगता हातात पिशवी घेवुन घरून निघून गेली आहे. तिच्या नातेवाईकाकडे व आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊन विचारपूस केली असता शोध लागला नाही.
हरविलेल्या महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे
सदर महिलेचे वय 39 वर्ष, रंग गोरा, उंची 5 फूट, मजबुत-बांधा, चेहरा गोल, अंगात गुलाबी रंगाची साडी, उजव्या हातावर संगिता विजय आवळे असे गोदविलेले आहे. सदर वर्णनाची महिला परिसरात आढळून आल्यास सदर हरवलेल्या महिलेची माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस स्टेशन, पडोली च्या वतीने करण्यात आले आहे.

Pages