खबरकट्टा/ चंद्रपूर :
हिन्दुह्रदयसम्राट, शिवसेनाप्रमुख आदरनिय स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी मोरवा येथील स्वीकार दुर्बल मनस्क (मतिमंद) मुलांची निवासी शाळा येथे साजरी करण्यात आली.
शिवसेना पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक व प्रवक्ता प्रा. शिल्पाताई बोडके यांच्या आदेशाप्रमाणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात व प्रेमीलाताई लेडांगे, माजी जिल्हाप्रमुख निलीमाताई शिरे यांच्या सूचनेनुसार बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मोरवा येथील स्वीकार दुर्बल मनस्क (मतिमंद) मुलांची निवासी शाळा येथे मुलांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख सौ. ऊज्वलाताई नलगे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन करून आदरनिय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला माल्यार्पण करून केक कापण्यात आला. त्यावेळी मतिमंद मुलांच्या विविध स्पर्धा उपस्थितीतांचे आकर्षण ठरले. मुलांनी सुंदर चित्र रेखाटले. चित्रांच्या माध्यमातून स्वतःमधील कलागुणांना वाव मिळवुन दिला. तसेच संगीत खुर्ची, विवीध गाण्यांवर नृत्य सादर केले. यावेळी संस्थेच्या संचालीका श्रीमती रेखाताई पिपंळशेंडे, मुख्यध्यापिका सुनिता लोंढे, वैशाली पिपंळशेंडे, प्रकाश राजुरकर सर, शिक्षक वृंद व संस्थेचे कर्मचारी तसेच शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुख कुसुमताई उदार, उपजिल्हाप्रमुख सौ. विद्याताई ठाकरे, माजी शहर प्रमुख पुष्पाताई काळे, शहर संघटीका वर्षाताई कोठेकर, माजी उपशहर संघटीका मंगलाताई पाल, उपशहर संघटीका किरणताई जुनघरे, सौ. वर्षा काळे, जोहरा धारिया, विभाग प्रमुख संध्याताई जाधव, शाखाप्रमुख कविता कोपलवार, उपशाखाप्रमुख पंचशिला मांडवकर, मंजुषा वैद्य उपस्थित होती
