परिवहन कार्यालयात लैंगिक छळ - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



परिवहन कार्यालयात लैंगिक छळ

Share This
खबरकट्टा/ नागपूर:
परिवहन विभागातील मोटार निरीक्षक महिलेच्या लैंगिक छळ प्रकरणात नागपूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी चांगलेच अडचणीत सापडले आहे. पीडितेच्या या आरोपाने परिवहन विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.
पीडितेच्या तक्रारीवरून परिवहन आयुक्तांनी तात्काळ महिला तक्रार निवारण मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. सदर महिलेचे आरोप बिनबुडाचे असून या चौकशीला मी सामोरं जाणार असे परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रवींद्र भुयार हे नागपूर शहर परिवहन विभागाच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर आहे.पीडित मोटार वाहन निरीक्षक महिलेने राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे.
यासंदर्भात राज्य महिला आयोगाने दखल घेत 7 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. नागपूर RTO कार्यालयात कार्यरत पीडित महिलेने यांनी भुयार या संदर्भात दिलेल्या लेखी तक्रारीत मला काम नसताना कार्यालयात तासनतास बसवून ठेवतात व स्त्री ला लज्जा वाटेल असे विनोद करतात.

कार्यालयाचे वाहन असताना सुद्धा मला घरी सोडायला सांगतात, आपण सोबत लॉंग ड्राईव्ह ला जाऊ, घरी आले की उशिरापर्यंत बसतात, मी काही बोलले की लाचलुचपत विभागाकडे खोटी तक्रार देणार असे धमकवीत असतात, रात्री अपरात्री फोन करून मला त्रास देतात, याबाबत मी पतीला सुद्धा सांगितले आहे.9 जानेवारीला माझ्या भावाने परिवहन कार्यालय गाठत भुयार यांना जाब विचारला असता त्यांनी पुन्हा असे करणार नाही सांगत माफी मागितली होती मात्र त्यानंतर सुद्धा हा प्रकार सुरूच होता.

Pages