चंद्रपूर लगतच्या मोरवा विमानतळालगच्या शेतशिवारात वाघाच्या झुंजीत सहा महिन्याचा वाघाचा बछडा ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आज गुरूवारी ( 16 डिसेंबर) ला उघडकीस आली आहे.
सावली तालुक्यात शिकारीच्या उदेश्याने वाघाला ठार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आजच गुरूवारी (16 डिसेंबर 2021 ) चंद्रपूर लगतच्या मोरवा शेतशिवारात वाघाच्या झुंजीत सहा महिन्याचा वाघाचा बछडा ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मोरवा विमानतळ परिसरातील शेतशिवारात चार ते सहा महिन्याच्या वाघाचा बछड्याचा मृतदेह आढळला आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.