शैक्षणिक ब्रेकिंग : 10वी -12विची लेखी परीक्षा जाहीर #10th-exam-date - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



शैक्षणिक ब्रेकिंग : 10वी -12विची लेखी परीक्षा जाहीर #10th-exam-date

Share This
खबरकट्टा /न्युज डेस्क :


दहावी आणि बारावीच्या परीक्षा ची तारीख आज जाहीर करण्यात आली असून त्यानुसार दहावीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या दरम्यान तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7एप्रिल या कालावधीत होणार आहे.


राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री नाम. वर्षा गायकवाड यांनी आज ही माहिती दिली.दहावी परीक्षेचा निकाल दहा जुलै रोजी तर बारावीचा निकाल 12 जून रोजी लवण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले.


राज्यात परीक्षांबाबत मोठी बातमी, गेल्या दोन वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या दहावी व बारावीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 10 वीची परीक्षा 15 मार्चे ते 18 एप्रिल दरम्यान होणार आहे, तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी Twitter च्या माध्यमातून दिली आहे.


गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या १० आणि १२ च्या परीक्षा होणार आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे विद्यार्थी या परीक्षांना मुकले होते मात्र यंदा होणार असल्याने विद्यार्थांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. यावेळेस देशात ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट आल्यानंतर यंदातरी परीक्षा होणार का? असा सवाल अनेक विद्यार्थ्यांना पडला होता. याबाब वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत, दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.


त्यात बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान पार पडणार आहेत. तर त्यानंतर दहावीच्या परीक्षांना सुरूवात होणार आहे. दहवीच्या परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिलदरम्यान पार पडणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ उपलब्ध होणार आहे. 14 फ्रेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत बारावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दहावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत.

Pages