पुण्यातील यशदाच्या धर्तीवर माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पकतेतून उभारण्यात आलेली वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधनी अर्थात वनअकादमीची भव्य व सुंदर इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
ही अकादमी देशातील दुसºया क्रमांकाची सर्वोत्तम इमारत आहे. वन प्रबोधिनीचे स्थावर बांधकाम पूर्ण झाले असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप इमारती ताब्यात दिलेल्या नाहीत.
वनसंरक्षण कायद्यांतर्गत वनजमिनीला मुक्त करणे, महापालिकेकडून अग्निसुरक्षा प्रमाणपत्र आणि इमारतीसाठी लागणारा लाकूड थेट वन विभागाकडून खरेदी करण्यात आल्याने सुमारे 17 कोटींचा निधी बांधकाम अनुदानातून वळता केला होता.
त्यामुळे सदर निधीची तरतूद वन विभागाकडून करणे व सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरित करणे अपेक्षित आहे. त्यानंतरच वन प्रबोधिनीचा परिसर ताब्यात देण्यात येणार आहे.