पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, ब्लॅंकेट व फळवाटप कार्यक्रम
खबरकट्टा /चंद्रपूर:
राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबीर, ब्लँकेट व फळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विजय वडेट्टीवार फॅन क्लब व विजय क्रांती कामगार संघटनेच्या माध्यमातून नगरसेवक नंदू नागरकर, वडेट्टीवार फॅन क्लबचे अध्यक्ष प्रवीण लांडगे, सामाजिक कार्यकर्ते मतीन कुरेशी, प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील रूग्णांना ब्लँकेट व फळवाटप करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सर्वांना विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. सोबतच विजय वडेट्टीवार हे राज्याचे कार्यक्षम मंत्री असून त्यांचा वाढदिवस संपूर्ण वर्षभर सेवा वर्ष म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले. यावेळी १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी नगरसेवक नंदू नागरकर, प्रवीण लांडगे, नम्रता ठेमस्कर, नगरसेविका सुनीता लोढिया, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंग गौर, सेवादलचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, अनुश्री दहेगावकर, शालिनी भगत, विशाल भगत, विनोद संकत, हाजी सय्यद अली,सोनू चिवंडे, अरविंद मडावी, सुनीता धोटे, शितल कातकर, लता बारापत्रे, मंगला शिवरकर, घनश्याम वासेकर, राजू दास, फारूक सिद्दीकी, बापू अन्सारी राजू बनकर राजा काझी मनोज वसेकर मंगला मडावी बबन देस्त्तीवर बंडू भाऊ गांत्वर मेडिकल कॉलेजचे डॉक्टर आनंद हजारे व त्यांचे सर्व नर्सेस कंपाउंडर व स्टॉप उपस्थिती होते. त्यांच्या सहकार्याने ब्लड कॅम्प यशस्वी झाला बहुसंख्यांना कार्यकर्ता उपस्थित होते.