श्री तिरूपती बालाजी देवस्थान चुनाळाच्या सामाजिक उपक्रमामुळे 254 मोतिबिंदू रूग्णांना मिळणार दृष्टी...:#rajura - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



श्री तिरूपती बालाजी देवस्थान चुनाळाच्या सामाजिक उपक्रमामुळे 254 मोतिबिंदू रूग्णांना मिळणार दृष्टी...:#rajura

Share This

दरवर्षी आयोजित केले जाते मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

खबरकट्टा /चंद्रपूर :राजुरा-


चुनाळा येथील श्री तिरूपती बालाजी देवस्थानाच्या सोळाव्या ब्रम्होत्सव सोहळयाअंतर्गत परिसरातील अंध रूग्णांना दृष्टी लाभावी याकरीता दरवर्षीप्रमाणे मेडीकल कॉलेज सेवाग्राम च्या सहकार्याने आयोजित मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीरात जवळपास 585 रूग्णांची तपासणी करण्यात आली त्यातील 254 रूग्ण मोतिबिंदू शस्त्रक्रियेस पात्र ठरले असून या सर्वांना देवस्थानाच्या या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून दृष्टी मिळणार आहे.

मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराच्या उद्घाटन सोहळया प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मानिकगड सिमेंट चे युनिट हेड उदयकुमार पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून देवस्थान कमेटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर, राजुराचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, अंबूजा सिमेंट फाऊंडेशन चे समन्वयक श्रीकांत कुंभारे, लायन्स क्लब चे माजी अध्यक्ष तथा प्रकल्प निदेशक डॉ. मंगेश टिपणीस, मानिकगड सिमेंट चे श्रीवास्तव, राजुरा चे नेत्रचिकित्सक डॉ. शंकरराव बुराण, के.एम. लांजेवार, चुनाळा चे सरपंच बाळनाथ वडस्कर, तंटामुक्त समिती चे अध्यक्ष दिलीप मामा मैसने, पोलीस पाटील रमेश निमकर देवस्थान कमेटीचे शंकर पेद्दुरवार, सुरेश सारडा, मनोज पावडे, अशोक शहा, गोरखनाथ शुंभ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तावीक चुनाळा चे सरपंच बाळनाथ वडस्कर यांनी केले तर देवस्थान कमेटीचे अध्यक्ष माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी मार्गदर्शन करीत देवस्थान कमेटीच्या वतीने फक्त धार्मिक विधी न करता परिसरातील गोर-गरीब जनतेची सेवा करण्याचा मानस देवस्थानाचा आहे. दर वर्षी या ब्रम्होत्सव सोहळयाच्या माध्यमातून विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक कार्य करणे आमचे कर्तव्य आहे. त्याकरीता रक्तदान शिबीर, भोजनदान, मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. मागील सतत बारा वर्षापासून या मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन देवस्थानाच्या माध्यमातून केल्या जात असून मोठया प्रमाणात रूग्णांना याचा लाभ होत आहे याचा देवस्थान कमेटीला अभिमान आहे. मेडिकल कॉलेज सेवाग्राम सारख्या सामाजिक संस्थांनी सहकार्य केल्यास असे उपक्रम देवस्थानाच्या वतीने पुढेही मोठ्या प्रमाणावर राबविल्या जाईल असे मत व्यक्त केले.

सदर शिबीरात परिसरातील रूग्णांनी मोठया प्रमाणात गर्दी केली. त्यात जवळपास 585 रूग्णांनी तपासणी करून 254 रूग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले. या सर्व रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी दिलेल्या तारखांत सेवाग्राम येथे नेऊन शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबीरात रूग्णांची तपासणी मेडीकल कॉलेज सेवाग्राम चे डॉ. अझहर शेख, डॉ. गुरूदेव मालवे, डॉ. अलिंद मुरखे, समाजसेवक सचिन ताकसांडे, साहील वानी, अविनाश भोंगळे, गोपाल नंदूरवार, अजय लोढे यांनी केली.

कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार विकास मेंढूलकर यांनी मानले. याप्रसंगी मोठया संख्येनी रूग्ण, त्यांचे नावेवाईक, भावीक भक्त व परिसरातील जनता उपस्थित होती.

Pages