समाजाला प्रेरणा देणारा उपक्रम
खबरकट्टा : चंद्रपूर :
भटाळी गावातील सामाजिक कार्यकर्ते आरोग्य मित्र व रक्तदूत असे परिसरात नावाजलेले सचिन उपरे यांनी दि. 12/12/2021 कोणताही अवाजवी खर्च न करता नेहमी प्रमाणे आपला वाढदिवस अनाथालयात जाऊन शालेय जीवनात आवश्यक बुक व पेनी देऊन साजरा करण्यात आला. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या प्रकारचे विशेष आयोजन करून जसे आरोग्य शिबीर तसेच ब्लड कॅम्प गावा-गावात लावून लोकांना रक्तदानासाठी प्रवृत्त करणे तसेच लोकांना मदत करणे हे सर्व कार्य सतत चालू असतात. याही वर्षी भाऊ नि सामाजिक दायित्व जपत आपला वाढदिवस आशियाना अनाथालय वांढरी मध्ये साजरा केला.