गोंडीयन जिल्हा अधिवेशनाने घडविले प्रबोधन पर्व:#chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



गोंडीयन जिल्हा अधिवेशनाने घडविले प्रबोधन पर्व:#chandrapur

Share This

 

विविध विषयांवर विचारमंथन, नऊ कर्तृत्वान व्यक्तींचा गौरव

खबरकट्टा /चंद्रपूर :-


गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्था चंद्रपूर च्या वतीने शनिवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडलेल्या पहिल्या जिल्हा अधिवेशनात विविध विचार मंथनद्वारे प्रबोधनाचे क्षितिज विस्तारित केले. मान्यवरांच्या हस्ते नऊ कर्तृत्वान व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला.


अध्यक्ष स्थानी गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेच्या अध्यक्ष लोकेश मडावी, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत यांनी उदघाट्न केले, प्रमुख अतिथी आमदार किशोर जोरगेवार, स्वागताध्यक्ष गोंडराजे वीरेंद्रशहा आत्राम, प्रमुख पाहुणे गो. ग. पा. प्रदेश कार्याध्यक्ष मनोज आत्राम, गो. ग. पा. युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके, गो. ग. पा. चे जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन चे केंद्रीय अध्यक्ष मधुकर उईके, आफ्रोट चे महासचिव नंदकिशोर कोडापे, मुकेश पेंदाम, ऍड. प्रियशी टेकाम उपस्थित होते,



संस्थेचे सचिव सुधाकर कन्नाके यांनी प्रास्ताविक केले, यावेळी डॉ. श्रीनिवास सुरपाम, प्राचार्य शांताराम उईके, डॉ. शारदा येरमे, डॉ. प्रवीण येरमे, राजेंद्र परतेकी, राजेंद्र मडावी, नंदकिशोर नैताम, राहुल कन्नाके आदिंचा स्मुर्तीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

आयोजनासाठी कार्याध्यक्ष ज्योतीरावण गावडे, विजय तोडासे, डॉ. आनंद किन्नाके, संचालक डॉ. विजयकुमार खंडाते, प्रवीण आडेकर, रमेश कुंभरे, उमाजी कोडापे, सुरेश तोरे, मातृशक्ती संघटनेच्या अर्चना खंडाते, लता शेडमाके, रजनी परचाके, विद्या सयाम, पौर्णिमा गेडाम, किरण पेंदोर, अश्रका कुमरे, मनीषा परचाके, दामोधर खंडाते, गुणाकार जुमनाके, सुनील तलांडे, राजू परचाके, राजेंद्र किन्नाके, निलेश कुमरे, संजय तोडासे, डॉ. सुधाकर मडावी, प्रमोद इरपाते, माणिक परचाके, लिंगोराव सोयाम, सुनील पेंदाम, रवींद्र उईके, संतोष दळाजे, विलास आडे, घनश्याम पेंदाम, रवींद्र वरखडे, सुरेश मडावी, विजय परचाके, खेमराज किन्नाके, किसन आलाम, निलेश मडावी अमृत आत्राम, शालिक गेडाम, गोंडीयन विद्यार्थी संघटनेचे सारंग कुमरे, पलाश पेंदाम, गणपत नैताम, विलास परचाके आदींनी सहकार्य केले.


कार्यक्रमाचे संचालन ज्योतीरावण गावडे, अर्चना खंडाते यांनी केले, गुणाकार जुमनाके यांनी आभार मानले.

Pages