खबरकट्टा /चंद्रपूर :
विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन,नागपूर (वी. टि. बी. सी. ए.) अंतर्गत २० वी सिनियर व १३ वी सब ज्युनिअर राज्यस्तरीय टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नुकताच विदर्भाचे नंदनवन चिखलदरा जिल्हा अमरावती येथे करण्यात आले होते सदर स्पर्धेत विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यातील ४०० खेळाडूंनी सहभाग दर्शविला होता या २० वी सिनियर राज्यस्तरीय टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्य , सिटी टेनिस बॉल क्रिकेट असोशिएशन चंद्रपूर मुलींचा (ग्रामीण) संघाला रुचिता आंबेकर (कर्णधार) यांच्या नेतृत्वाखाली प्रथम स्थान प्राप्त झाले व सब ज्युनिअर मुलांच्या (सिटी) संघाला वंश बोबाटे (कर्णधार) यांच्या नेतृत्वाखाली प्रथम स्थान प्राप्त झाले तसेच सिनियर (सिटी) मुलांच्या संघाला पवण खनके (कर्णधार) यांच्या नेतृत्वाखाली तृतीय स्थान तर सिनिअर मुली (सिटी) संघाला निकिता ढोरके (कर्णधार) यांच्या नेतृत्वाखाली तृतीय स्थान प्राप्त झाले.
चंद्रपूर ग्रामीण सिनिअर मुलींच्या संघाला प्रशिक्षक म्हणून प्रा.विक्की पेटकर सर व्यवस्थापक म्हणून इंद्रजित निषाद व चंद्रपूर (सिटी) सिनिअर मुलींच्या संघाला प्रशिक्षक म्हणून रुचिता आंबेकर तर व्यवस्थापक म्हणून इखलाख पठाण हे होते तसेच चंद्रपूर (सिटी) सिनिअर मुलांच्या संघाला प्रशिक्षक म्हणून विश्वास इटनकर तर व्यवस्थापक म्हणून निखिल पोटदुखे व चंद्रपूर (चंद्रपूर) सिनिअर मुलींच्या संघाला प्रशिक्षक म्हणून बंडू डोहे तर व्यवस्थापक म्हणून गौरव रांदिवे हे होते तर सब ज्युनिअर मुलांच्या संघाला प्रशिक्षक म्हणून सूरज परसुटकर तर व्यवस्थापक म्हणून पवन पेटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते...
सदर स्पर्धेत यशाबद्दल चंद्रपूर जिल्हा,सिटी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन चंद्रपूर चे अध्यक्ष डॉ.अनिस अहमद खान व सचिव प्रा. विक्की तुळशीराम पेटकर व डॉ. महेश शर्मा व प्रा. पूर्वा खेरकर इतर पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.