कोरपना - तालुक्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी:#korpana - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



कोरपना - तालुक्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी:#korpana

Share This

भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांचे मार्फत कृषिमंत्र्यांना निवेदन


खबरकट्टा /चंद्रपूर :कोरपना :


कोरपना - तालुक्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीसाठी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांचे मार्फत कृषिमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

कोरपना तालुका हा कृषिप्रधान तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील तूर उत्पादनाला वाळवी लागल्याने मर रोगाची लागण झाली आहे. यातच शेतकऱ्यांचे हाती आलेले पिक भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या बदलण्याचे मोठे नुकसान होत आहे. यावर शासनाने तातडीने पंचनामे करून संकटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत यावी अशी अपेक्षा दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. याप्रसंगी दिनेश खडसे राहुल पायघन अमोल चौधरी नारायण राठौड सह मोठ्या संख्येने शेतकरी व भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Pages