:- तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी विजय रामटेके तर सचिव पदी गोवर्धन दोनाडकर व उपाध्यक्ष म्हणून प्रा. शाम कंरबे यांची अविरोध निवड.......
खबरकट्टा /चंद्रपूर : ब्रम्हपुरी:-
ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज दींनाक १० डिसेंबर ला शिवाजी चौक येथील विश्राम गृहात आमसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सन २०२२-२०२५ करिता कार्यकारणी गठीत करण्यात आली. ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी विजय रामटेके तर सचिव पदी गोवर्धन दोनाडकर व उपाध्यक्ष पदी प्रा. शाम कंरबे यांची एकमताने निवड करण्यात आली. हि निवड आमसभा अध्यक्ष प्रा. विजय मुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
तर सहसचिव म्हणून महेश पिल्लारे, कोष्याध्यक्ष पदी प्रविण मेश्राम, संघटक सचिव म्हणून शिवराज मालवी, प्रसिद्धी प्रमुख पदी अमर गाडगे, व कार्यकारणी सदस्य म्हणून दिलीप शिनखेडे, नेताजी मेश्राम, जिवन बागडे, प्रा. विजय मुळे, दिपक पत्रे, दिवाकर मंडपे यांची एकमताने निवड करण्यात आली.