नगर पंचायत निवडणूकीत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा भारतीय जनता पार्टीला पाठींबा जाहिर:#sudhir-mungantiwar. - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



नगर पंचायत निवडणूकीत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा भारतीय जनता पार्टीला पाठींबा जाहिर:#sudhir-mungantiwar.

Share This

खबरकट्टा /चंद्रपूर :



दिनांक २१ डिसेंबर २०२१ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात होवू घातलेल्या पोंभुर्णा, गोडपिपरी, जिवती, कोरपना, सावली व सिंदेवाही या नगर पंचायतींच्या सार्वत्रीक निवडणूकीत पिपल्स रिपब्लीकन पार्टीने भारतीय जनता पार्टीच्या उमेदारांना पाठींबा जाहीर केला आहे.

माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीने प्रेरीत होवून पिपल्स रिपब्लीकन पार्टी चंद्रपूर जिल्हा शाखेने भारतीय जनता पार्टीला पाठींबा जाहीर केला असल्याचे पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.

पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पार्टीच्या विचारसणीच्या जनतेने या निवडणूकीत भाजपाच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन पिपल्स रिपब्लीकन पार्टी चंद्रपूर शाखेचे अध्यक्ष हरीश दुर्योधन, जिल्हा कार्याध्यक्ष धर्मराज पाटील, जिल्हा सरचिटणीस तेजराज मानकर, जीवन वनकर, मनोहर वनकर, रेकचंद मानकर, मारोती मानकर, बंडू उराडे, ताताजी मानकर आदींनी केले आहे.

Pages