25 हजारांची लाच घेताना भद्रावती तहसीलदार खटके ACB च्या जाळ्यात:#acb - bhadravati - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



25 हजारांची लाच घेताना भद्रावती तहसीलदार खटके ACB च्या जाळ्यात:#acb - bhadravati

Share This

 चंद्रपूर जिल्हा महसूल प्रशासनात खळबळ

खबरकट्टा /चंद्रपूर :भद्रावती -


तब्बल 2 महिन्यांपूर्वी भद्रावती येथे तहसीलदार म्हणून रुजू झाले डॉ. निलेश खटके यांना नागपूर लाचलुचपत विभागाने 25 हजार रुपये घेताना रंगेहात अटक केली आहे.

विटा भट्टी साठी लागणाऱ्या लाल माती उत्खननाची परवानगी देण्यासाठी तहसीलदार खटके यांनी फिर्यादीला तब्बल 25 हजार रुपये मागितले मात्र लाच द्यायची इच्छा नसल्याने याबाबत फिर्यादीने लाचलुचपत विभागाला सम्पर्क साधत तक्रार केली.

तक्रारीची पडताळणी केल्यावर तहसील कार्यालय भद्रावती येथे 25 हजार रुपये स्वीकारताना तहसीलदार खटके यांना रंगेहात अटक करण्यात आली.

2 महिन्यांपूर्वी पोंभुर्णा तालुक्यात तहसीलदार म्हणून कार्यरत खटके यांची बदली भद्रावती येथे झाली होती, मात्र महिन्याभराच्या कालावधीत त्यांना लाच प्रकरणी अटक झाल्याने महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Pages