प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थी करणार आंदोलन..
खबरकट्टा /चंद्रपूर :गडचिरोली :
डाॅ. प्रशांत श्रीधर बोकारे यांची गडचिरोली येथील गोंडवना विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी, ओ. पी. जिंदाल विद्यापीठ, रायगड येथील स्कुल ऑफ इंजिनिअरिंग येथे प्राध्यापक व अधिष्ठाता असलेले डॉ. प्रशांत बोकारे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. बोकारे यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे.
7 सप्टेंबर 2020 रोजी गोंडवना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. मध्यंतरी डॉ. शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण त्यांनी रूजू होण्यास नकार दिल्याने पुन्हा कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया राबवली गेली. दरम्यान, रामटेक येथील कवि कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.सद्यास्थितीत गोंडवाना विद्यापीठात MSW प्रवेशाबाबत सुरू असलेला भोंगळ कारभार उग्र रूप धारण करण्याची शक्यता दिसत आहे. विद्यार्थी शिक्षणासाठी खूप लांब पल्ल्याच्या ठिकाणावरून येऊन आर्थिक संकटात सापडले आहेत.
विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेश द्यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे केलेली आहे. दि. 10/12/2021 ला दुपारी 2 वाजेपर्यंत MSW प्रवेशाचा मार्ग सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र प्रवेशाचा मार्ग सोडविण्यासाठी विद्यापीठ प्रशासन अपयशी ठरल्यास विविध प्रकारचे भोगळ कारभार चव्हाट्यावर येतील. तेव्हा शिक्षण.. कायदा आणि व्यवस्थापन प्रणाली उजेडात आणली जाईल.
गडचिरोली जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या गोडवांना विद्यापीठात MSW प्रवेशाबाबत भोंगळ कारभार झाला असून विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावूनही मुलाखती न घेता परस्पर संबंध असलेल्या उमेदवारांना प्रवेश देण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. . त्यामुळे विद्यार्थ्यांना MSW अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे. या गंभीर बाबीकडे नवनियुक्त कुलगुरूंनी पराकोटीचे लक्ष वेधून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे.
गोंडवाना विद्यापीठाच्या अखत्यारीत असलेल्या एम. एस. डब्ल्यू महविद्यालयात वाढीव जागा देवुन सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. तसे विद्यापीठाला शक्य नसल्यास गुणवत्ता तपासणी करण्यात यावी यासाठी पून्हा पारदर्शक पद्धतीने मुलाखती घेऊन कोणत्याही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेऊ नये. याबाबत विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ योग्य निर्णय घ्यावा. अशी मागणी अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन सादर करतांना किसन बोबड़े , शितल टेंभूर्णे,प्रतिक रायसिडाम, बालाजी शास्त्रकार, स्वप्नील डांगे, अश्विनी बोबडे,अंजली टेकाम , प्रणाली नसपुलवार, रोशन वाडकर, पायल कुभांरे, स्नेहल गहाने, प्रांजली रामटेके, प्रिती जांभुळे , सोनू जांभुळे, सोनल पल्लो , जयशिला दुर्गे, यांच्यासह उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांना योग्य न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचेही संतप्त असलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले.