मानवाधिकार हा लोकशाहीचा पाया आहे- डॉ विजय तुंटे:#vijay-tunte - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



मानवाधिकार हा लोकशाहीचा पाया आहे- डॉ विजय तुंटे:#vijay-tunte

Share This


खबरकट्टा /चंद्रपूर :राजुरा:


श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना पथक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये मानवाधिकार बद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आभासी आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रताप महाविद्यालय अमळनेर येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ विजय तुन्टे हे आभासी उपस्थित राहून 'मानवाधिकार : चिंता आणि चिंतन' याविषयावर मार्गदर्शन केले, यावेळी मानवाधिकार प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारा घटक असून त्याशिवाय कोणत्याही समाजात, राष्ट्रात शांतता नांदू शकत नाही, अलीकडच्या काळात मानवाधिकारांचे मोठ्या प्रमाणावर हनन आणि अनादर होत आहे असेच होत राहिल्यास एके दिवशी संपूर्ण मानव जमात या पृथ्वीतलावरून नामशेष होईल व केवळ पशू-प्राणी राहतील त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने मानवी अधिकारांचे आदर केले पाहिजे सन्मान केला पाहिजे असे प्रतिपादन केले.

या आभासी व्याख्यानासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. एम. वारकड, सोबत उपप्राचार्य डॉ आर. आर. खेरानी, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र मुद्दमवार, डॉ. सारीका साबळे, डॉ नागनाथ मनुरे, इतिहास विभागप्रमुख तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बलकी, महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे एन एस एस च्या युट्यूब चॅनेल वर थेट प्रक्षेपण करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. गुरुदास बलकी, प्रास्तविक डॉ राजेंद्र मुद्दमवार, आणि आभार डॉ नागनाथ मनुरे यांनी केले.

Pages