बाबासाहेबांच्या वस्तू टिकणार 100 वर्षे, प्रयोगशाळेत केली जातेय रासायनिक प्रक्रिया #dr-babasaheb-ambedkar - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



बाबासाहेबांच्या वस्तू टिकणार 100 वर्षे, प्रयोगशाळेत केली जातेय रासायनिक प्रक्रिया #dr-babasaheb-ambedkar

Share This
खबरकट्टा / नागपूर :

बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेला ऐतिहासिक कोट व इतर कपडे जतन करून ठेवण्यात येणार आहेत. त्यामध्ये संविधानाचा मसुदा टाईप करणारा टाईपरायटरचा समावेश आहे. संग्रहालयात सुमारे 350 पेक्षा जास्त वस्तूंचा समावेश आहे. आतापर्यंत 98 वस्तूंवर प्रक्रिया रासायनिक प्रक्रिया झाली आहे. या प्रक्रियेनंतर वस्तू सुमारे 100 वर्षे टिकून राहतील. नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयातील प्रयोगशाळेत ऐतिहासिक वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया केली जात आहे. नॅशनल रिसर्ज लेबारेटरी फॉर कंझर्वेशन ऑफ कल्चरल प्रापर्टीज लखनौ या केंद्र सरकारच्या संस्थेतर्फे हे काम केलं जातंय.

कळमेश्वर रोडवरील चिचोलीत बाबासाहेबांच्या संकल्पनेतील बौद्ध केंद्र साकारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 1957 मध्ये गोपिकाबाई ठाकरे यांनी 11 एक जागा दान दिली. या जागेवर धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांनी शांतीवन उभारले आहे. त्यात बाबासाहेबांनी वापरलेले कपडे, कोट, हॅट, छत्री, पेन, कंदील या वस्तूंचा संग्रह करण्यात आलाय. या वस्तूंना वाळली लागत असल्याची बाब पुढं आली होती. शांतीवन चिचोलीतील भारतीय बौद्ध परिषदेने या वस्तूंचे जतन करण्याची मागणी शासनाकडं केली होती. त्यानंतर वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करून जतन करण्यात येत आहे.

♦️ निधीअभावी काम रखडले : 

सरकरानं शांतीवन चिचोलीसाठी 40 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केलाय. येथे मेडिटशन सेंटर, वस्तूसंग्रहालय, अतिथी गृह उभारण्यात येणार आहे. परंतु, निधीअभावी हे काम अर्धवट आहे. राज्य सरकारनं उर्वरित निधी उपलब्ध करून दिल्यास तयार झालेल्या इमारती सर्वांसाठी खुल्या करता येतील, असं भारतीय बौद्ध परिषदेचे कार्यवाह संजय पाटील यांनी सांगितलं.

♦️ कोरोनामुळं दीक्षाभूमीवर निर्बंध :

महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन आहे. तो 6 डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. आंबेडकरांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते.


Pages