चंद्रपूर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे २७ रिक्त पदे त्वरित भरा:#pratibhatai-dhanorkar - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपूर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे २७ रिक्त पदे त्वरित भरा:#pratibhatai-dhanorkar

Share This
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे मागणी

खबरकट्टा /चंद्रपूर :


चंद्रपूर  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक शेतकरी आहेत. ग्रामीण भागात पशु कोणत्या रोगाने ग्रस्त असल्यास त्यांवर उपचार करण्याकरिता वेळेवर पशु वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसतो. त्यामुळे उपचार अभावी अनेक पशु दगावल्याच्या घटना समोर आल्या आहे. जिल्ह्यात २७ पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून तात्काळ भरण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

शेती सोबत जोड धंदा म्हणून पशु पालन करण्यात येते. रोगराई मोठ्या प्रमाणात होत असते. सध्या शेतीचे हंगाम सुरू असून या काळात पशु दगावल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. त्यासोबतच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात योजना राबवित असतात. त्यांची अंमलबजावणी होण्याची गरज असते. अनेक लाभार्थी त्या योजनेपासून वंचित राहत असल्याचे तक्रारी येत असतात. शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्या योजनेची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात यावी व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनेचा लाभ मिळण्याकरिता प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पशु वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणे आवश्यक आहे.

पशुधन हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. शेतकरी त्यांच्या गुरांची योग्य काळजी जरी घेत असले तरी त्या गुरांना आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी शासनाने पशुधन विकास विभागाकडे सोपविली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात पशु वैद्यकीय २७ पदे रिक्त असल्याने जिल्ह्यातील मोजक्याच वैद्यकीय अधिकाऱ्यावर हा भार आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुरांचा आरोग्याच्या धोका देखील वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात २७ पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून तात्काळ भरण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

Pages