जुनाळ कोळसा खाणीत सुरू आहे जीव घेई खेळ?...:# coal - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



जुनाळ कोळसा खाणीत सुरू आहे जीव घेई खेळ?...:# coal

Share This

 वणी नाॅर्थ क्षेत्र:- कोणतेही सायरण किंवा पुर्व सुचना न देता केली जाते ब्लास्टिंग...


शनिवारी घडला अचानक अपघात मात्र....

खबरकट्टा /यवतमाळ : वणी:-


वणी नाॅर्थ क्षेत्रातील जुनाळ कोळसा खाणीत कोळसा उत्पादनासाठी ब्लास्टिंग केल्या जाते पण याकरीता असलेल्या नियम व अटी दावणीला लावुन दि. 4 ला शनिवारी दुपारी 5 वाजता च्या दरम्यान कामगारांना कोणतीही सुचना नसतांना खाणीच्या आतील मशिन चेक करण्यासाठी वाहन क्र. एमएच 29 बी ई 0086 सात आठ कामगार व अधिकारी गेले असता प्रतिबंधक क्षेत्रात ब्लास्टिंग करीता कोणतेही रोखण्यास किंवा सुचना देणारे नसल्याने वाहणाने प्रवेश केला असता अचानक ब्लास्टिंग झाली यामुळे कोणतीही जीवीतहानी किंवा कोणतेही नुकसान झाले नसले, तरी हा जीव घेई खेळ कोणतीही अनुचित घटणा घडण्यापुर्वी रोखण्याची गरज आहे.

कोळसा हा उर्जा निमिर्ती करीता अतिमहत्वाचा घटक असुन गेल्या काही दिवसापुर्वी कोळशाच्या कमतरतेने देशात विज संकट निर्माण झाले होते, मात्र लवकरच कोळसा उत्पादणावर लक्ष देउन कामाला गती देत जुनाळ कोळसा खाणीने कोळसा उत्पादन सुरू केले कोळशा वरील माती व कोळशाला काढण्याकरीता त्यावर ब्लास्टिंग करून कोळसा काढण्यात येते परंतु या ब्लास्टिंग करीता असलेल्या नियमाला दावणीला लावुन ब्लास्टिंग करण्याच्या घटणा होत आहे.

या करीता 500 मी चे क्षेत्र प्रतिबंधित असते या क्षेत्रात जाणारे रस्त्यावर लाल झेंडा घेउन एक इसम प्रवेश रोखतो तसेच ब्लास्टिंग पुर्वी सायरण वाजविले जाते असा नियम असतांना नियमांचे पालन न करता दि. 4 ला सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान ब्लास्टिंग करण्यात आली यावेळी खाणीच्या आत असलेल्या यंत्राची तपासणी करण्यासाठी वाहन क्र. एम एच 29 बी ई 0086 अधिकारा-यासह कामगार गेले असता यावेळी खाणीत ब्लास्टिंग झाली, त्यावेळी प्रतिबंधक क्षेत्रात कोणीच प्रवेश बंदी केली नव्हती व ब्लास्टिंग सायरण सुध्दा वाजविले नाही. अशात या वाहणाला कोणतेही नुकसान हानी झाली नसली तरी कामगारांना मोठा धसका बसला असुन, ब्लास्टिंगच्या काळात नियमांचे तंतोतंत पालन करण्याची गरज आहे, या घटणेबद्दल इंटकचे एरीया सचिव संजय वासेकर यांनी ब्लास्टिंग अधिकारी यांना विचारणा केली असता ब्लास्टिंग अधिकारी चवरे यांनी उडवा उडवीचे उत्तर देत या घटणेचे गांभिर्य समजले नाही. असा प्रकार वेळेवर रोखला नाही तर मोठी घटणार घडण्यास वेळ लागणार नाही?,

त्यामुळे केव्हा कोणती अनुचित घटणा घडेल याचा नेम नाही, अनुचित प्रकार घडल्यावर फायदा काय? असाच प्रश्न उपस्थित होत असुन, खान प्रबंधक संतोश वर्मा यांनी घटणेची दखल घेत ब्लास्टिंगच्या काळात नियमांची पायमल्ली होणार नाही यांवर लक्ष देण्याची गरज आहे. ब्लास्टिंगच्या काळात खाणीत कामागाराचा प्रवेश रोखण्याची गरज असुन, अशात नजर चुकीने व अनावधानाने मोठी घटना होण्यास वेळ लागणार नाही, त्यामुळे सतर्कता बाळगून तात्काळ योग्य ते पाउल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

Pages