खबरकट्टा /चंद्रपूर:राजुरा
युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार च्या निर्देशानुसार स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2021 या काळात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे, त्याचाच भाग म्हणून श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे दिनांक 14 ऑक्टोबर 2021 ला सकाळी 8.30 वाजता राजुरा बस डेपोच्या समोरील वनविभागाच्या नर्सरी रस्त्यावरील प्लास्टिक कचरा, बॉटल, प्लास्टिक चे पॉकेट, प्लास्टिक ग्लास उचलून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे ५५ स्वयंसेवक उपस्थित होते.जंगले हि आपली धरोहर आहे आणि त्यामुळे जंगलातील प्लास्टिक प्रदूषण रोखून पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन वन्यप्राणी तथा पाण्यातील प्राण्यांचे जीव वाचविण्यासाठी सोबतच पर्यावरण संवर्धनासाठी स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबविली व पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. यावेळी श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. एम. वारकड, उपप्राचार्य डॉ आर.आर. खेरानी, कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की, डॉ सारिका साबळे, प्रा विठ्ठल आत्राम, प्रा. सदाशिव तुम्मावार राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त स्वयंसेवक विशाल शेंडे सोबत शिक्षकेत्तर कर्मचारी उपलब्ध होते.