नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार
तणावाचे वातावरण नीर्माण झाले
पोलीसांना पाचारण
खबरकट्टा /चंद्रपूर :चिमूर -
दिनांक.१४/१०/२०२१ ला संजय शीवा गराटे रा.नेरी वय ३५ वर्षे हे सकाळी ०७:०० वाजताच्या सुमारास लगवीच्या जागेवर दुखत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी याठिकाणी उपचार घेण्यासाठी आले असता डॉक्टरांची आरोग्य केंद्रामध्ये उपस्थिती नसल्याने रुग्णास होणारा त्रास हा वाढत गेला आणि डॉक्टरविना व उपचार न झाल्याने रुग्ण आरोग्य केंद्रातच मरण पावला.याची नेरी येथील स्थानिकांना माहिती मिळताच जनतेनी आक्रोश व्यक्त करीत आरोग्य केंद्रावर धाव घेतली व तणावाची परिस्थिती निर्माण करून डॉक्टरांच्या निलंबनाची मागणी केली.या घटनेला ४ तासापेक्षा जास्त वेळ झाला असून रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉ.महेश मंगर , डॉ.निखिल कामडी डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत शवविच्छेदन करणार नाही असा विरोध नागरीकांनी दर्शविला. व पोलिसांनी स्वतःहून मृतकाचे शव उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेले.याची माहिती काँग्रेस नेते सतिष वारजूकर जि. प.सदस्य तथा गटनेते यांना मिळताच क्षणी प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून रुग्णाच्या नातेवाईकांची मते जाणून घेतली व डॉक्टरांना सस्पेंड करून सस्पेंशन ची ऑर्डर जो पर्यंत देण्यात येणार नाही तोपर्यंत आरोग्य केंद्रातील ऑफिस सोडण्यात येणार नाही असेही यावेळी स्थानिकांसमोर मत मांडण्यात आले व या ठिय्या आंदोलनाला यश प्राप्त होत मागणी ऎकून जिल्ह्यावरून तात्काळ सस्पेंशन ऑर्डर आली.व प्रकरण शांतचित्तेने कुठलाही गालबोट न लागता परिस्थिती आटोक्यात आणण्याचे कार्य पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सभापती लताताई पिसे, तालुका अध्यक्ष संजय घुटके, जि. प.सदस्य मनोज ममिडवार, तालुका सचिव विजय डाबरे, चिमूर शहर अध्यक्ष अविनाश अगडे, विधानसभा अध्यक्ष गौतम पाटील, तालुका सरचिटणीस विलास मोहिणकर, सामाजिक कार्यकर्ते पप्पूभाई शेख, सरपंच रेखाताई पिसे ,ग्राम पंचायत सदस्य निखिल पिसे,तसेच विविध पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आणि गावकरी उपस्थित होते.
तात्काळ चंद्रपुर वरून चंद्रपुरचे डी.एच.ओ. राजकुमार गहलोत येवून नेरी प्राथमीक आरोग्य केंद्रात दाखल झाले .येथील पुर्ण अधीकाऱ्यांना फटकारले. दोषी अधीकाऱ्यांना नीलबींत करण्याचे सुध्दा सांगीतले. यानंतर पुर्ण अधीकारी स्थानीक ठीकाणी राहण्याचे आदेश सुध्दा दीले. नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही सामानाची तोडफोड आक्रमक जमावांनी केली. आमदार बंटीभाउ भांगडीया यांची भेट नेरी प्राथमीक आरोग्य केंद्राला भेट दिली.
सोय सुवीधा उपलब्ध करा नाहीतर चिमूर तालुक्यातील सर्व पी.एच. सी.ही.बंद करू , दोन्ही डॉक्टरांच्या वैद्यकीय डीग्री रद्द करण्यासाठी कॉन्सीलकडे पाठपुरावा करणार , नेरी प्राथमीक आरोग्य केंद्राचा स्टाप बदलला , सगळ्या अधीकाऱ्यांचे इंन्क्रीमेंट रोका , डॉक्टरावर गुन्हा दाखल करख असे चंद्रपुरचे डी.एच.ओ. राजकुमार गहलोत यांना ठणकावून सांगीतले . या प्राथमीक आरोग्य केंद्रात पीण्याच्या पाण्याची सुशीला , संडास , बाथरूमची दयनीय अवस्था आहे . औषधांचा तुटवडा राहतो असे नागरीकांनी आमदार साहेबांना सांगितले.
यावेळेस वंसत वारजुकर , श्यामजी हटवादे , मारामारी नन्नावरे , संदीप पीसे, पींटु खाटीक अन्य भाजपा कार्यकर्ते उपस्थीत होते. वैद्यकीय अधीकारी डॉ. नीखील कामठी , डॉ. महेश मंगर यांना तात्काळ नीलंबीत करण्यात आले .पोलीसांनी संजय गराटे वय ३५ यांची अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. वैद्यकीय वीभागामार्फ झालेल्या चौकशीअंती व आरोग्य वीभागामार्फत येणाऱ्या तक्रारीनुसार चौकशी करण्यात येईल असे मंगेश मोहोड ए.पी.आय .नेरी चौकीचे इंजार्ज यांनी सांगितले आहे.