खबरकट्टा :चंद्रपूर
नकोडा : येथील 14 ऑक्टोबर रोजी बौद्ध विहारात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा उत्साहात पार पडला परमपूज्य विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले.माता रमाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून भीम वंदनेचे गायन करण्यात आले.
सदर सोहळ्याचे आयोजन परिवर्तन बौद्ध महिला मंडळाचे अध्यक्षा सौ.रंजना आनंद झाडे, उपाध्यक्ष सौ. शोभा लिलेंद्र रंगारी, सचिव सौ.पुष्पांजली कातकर, कोषाध्यक्ष सौ. माधवी विजय भगत,सदस्य सौ. उज्वला ठमके सौ. वंदना गौतम लोहकरे,सौ. भारती अरुण ठमके,सौ.पौर्णिमा अमोल झाडे, सौ. किरण प्रमोद कांबळे,सौ. संघरत्ना ठमके,सौ. उजवला पाटील यांनी केले.
सदर महिला संघटने तर्फे वयोवृद्ध निराधार महिला पुरुषा करिता निराधार गृह निर्माण करण्यात येणार आहे.महिला करिता स्वयंरोजगाराचे गृह उद्योग निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती संस्था अध्यक्षाने दिली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून घुग्घुस कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष राजूरेड्डी, नकोडा येथील प्रतिष्ठित नागरिक शरीफ शेख, कामगार नेते सैय्यद अनवर, रोशन दंतलवार, विशाल मादर,इर्शाद कुरेशी, रोहित डाकूर, बालकिशन कुळसंगे, छोटू शेख, जुबेर शेख,वस्सी शेख, व अन्य नागरिकगण उपस्थित होते.