काॅगेसचे मधुकर कोटनाके कार्यकर्त्यां सोबत गोंडवाना गणतंत्र पार्टीत सामील ..:#madhukar- kotnake - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



काॅगेसचे मधुकर कोटनाके कार्यकर्त्यां सोबत गोंडवाना गणतंत्र पार्टीत सामील ..:#madhukar- kotnake

Share This


खबरकट्टा /चंद्रपूर :


राजुरा - राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या राजुरा तालुक्यातील सोनापुर- भेंडवी येथिल काॅग्रेसचे कार्यकर्ते मधुकर एस. कोटनाके यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह गोंडवाना गणतंत्र पार्टी मध्ये प्रवेश केला. या वेळी त्यांचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पिवळा दुपट्टा देऊन स्वागत करण्यात आले असून अनेक कार्यकर्ते गोंगपात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत.


गोंडवाना गणतंत्र पार्टी चा मेळावा नुकताच राजुरा येथिल संत नगाजी महाराज सभागृहात संपन्न झाला. या मेळाव्यात मधुकर कोटनाके यांनी पक्ष प्रवेश केला. येत्या काही महिन्यांत अनुसूचित क्षेत्रातील ग्राम पंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत गोगपा समविचारी पक्षांना घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार आहे. त्या मुळे या पक्ष प्रवेशाला विशेष महत्त्व आहे.

गोंडवाना गणतंत्र पार्टी चे सोनापुर-भेंडवी येथिल खंबीर नेतृत्व तिरू.इसरू पाटील कुळमेथे हे कोरोना काळात आम्हाला सोडून पेनवासी (स्वर्गवासी) झाले. त्यांची उणीव पार्टिला व स्थानिक कार्यकर्त्यांना जानवू लागली होती पण सोनापुर येथिल पार्टी च्या पदाधिकारी यांनी जोमाने कामाला लागत नविन लोक जोडण्यास सुरूवात केली.

राजुरा विधानसभा कोअर कमिटी अध्यक्ष पांडूरंग जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्ष प्रवेशा वेळी गोगपा प्रदेश महासचिव अब्दुल जमीर अ. हमीद, जिल्हाध्यक्ष बापुराव मडावी, प्रदेश युवा कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके, माजी पं.स. सभापती भिमराव जी मेश्राम,प्रदेश संघटनमंत्री नामदेव शेडमाके, किसान पंचायत प्रदेशमहासचिव विजयसिंह मडावी,जिल्हा उपाध्यक्ष राजे संजिव आत्राम जिल्हा महासचिव भारत आत्राम, जिल्हा संघटक संतोष कुळमेथे,जिवती तालुका अध्यक्ष ममताजी जाधव, राजुरा तालुका अध्यक्ष अरूण उदे, उपाध्यक्ष प्रकाश वेडमे, सुखदेव गेडाम, अविनाश टेकाम, तालुका सचिव सुरेश जुमनाके, जिवनदास किनाके, राधाबाई आत्राम, संगिता आत्राम, अभि परचाके सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Pages