खबरकट्टा /चंद्रपूर :
बल्लारशहा:- तालुक्यातील केम तुकूम अत्याचार प्रकरणाबद्दल भारतीय जनता पार्टीचे दिनांक 18-10-2021 ला आंदोलन होतं आहे. व त्या आंदोलनला गोंडवाना गणतंत्र पार्टीचे समर्थन असल्याच पॉम्पलेट मध्ये दर्शविले आहे. ते चुकीचे आहे व लोकांची दिशाभूल करण्याचं कट कारस्थान आहे.
केम तुकूम येथील अत्याचार प्रकरणात गोंडवाना गणतंत्र पार्टी अत्याचार ग्रस्त कुटुंबासोबत आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दि. 5-10-2021 ला केमतुकूम येथे जाऊन पीडित कुटुंब व ग्रामस्थांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन करून धीर दिला. त्यांना न्याय मिळवा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहो असे मत गो. ग. पा. चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी यांनी व्यक्त केले.
भाजपच्या मोर्चा संबंधात दि.10-10-2021 ला जिल्हा परिषद सदस्य हरीश गेडाम यांनी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी यांच्या सोबत दूरध्वनी वरून संपर्क साधला असता. भाजपच्या नेतृत्वा खालील मोर्चाला समर्थन देणार नाही म्हणून पाठिंबा देण्यास गो. ग. पा. चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी यांनी नकार दिला. भाजपच्या आंदोलनास आम्ही कोणताही पाठींबा देणार नाही. भाजपचे लोक दिशाभूल करतात असा आरोपही त्यांनी केला.
जिल्हा परिषद सदस्य हरीश गेडाम यांनी पक्ष बाजूला ठेवत मोर्चाचे आयोजन करावे आम्ही त्यांच्या सोबत असल्याचेही मत बापूरावजी मडावी यांनी व्यक्त केले.