जुनोना येथे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम जयंती आणि वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न :#prem jarpotwar - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



जुनोना येथे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम जयंती आणि वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न :#prem jarpotwar

Share This


 🔰अभ्यासवर्गात वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम संपन्न

खबरकट्टा /चंद्रपूर :


दिनांक 15 ऑक्टोंबर ला चंद्रपूर तालुक्यातील जुनोना गावात डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करून वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे सामुहिक व वैयक्तिक वाचन घेऊन 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करण्यात आले. यावेळी जुनोना गावच्यातंटामुक्ती अध्यक्ष सौ चंदाताई देवगडे यांनी डॉ.कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.आणि शिक्षणप्रेमी प्रेम जरपोतवार यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


जुनोना गावातील सामाजिक जाणीव असणारा युवक प्रेम नामदेव जरपोतवार जुनोना गावात विविध सामाजिक उपक्रम तो राबवित आहे. विद्यार्थ्यांना  अभ्यासामध्ये गोडी लागावी यासाठी तीन वर्षापासून त्यांचे वर्ग घेत विविध उपक्रम तो जुनाना गावात घेत आहे.त्याच्या याच सामाजिक कार्यासाठी त्याला 2021 चा राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न अवार्ड मिळालेला आहे.


डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना आदरांजली म्हणून 15 ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. मुलांमध्ये वाचनाची सवय व्हावी, मुलांना वाचनाची गोडी लागावी, वाचनाचे महत्त्व समजावे, हाच वाचन प्रेरणा देण्याचा उद्देश आहे.यासाठी प्रेम जरपोतवार याने डॉ. कलाम यांची जयंती साजरी करून 'वाचन प्रेरणा दिन ' साजरा केले.


यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष सौ चंदाताई देवगडे, शिक्षणप्रेमी प्रेम जरपोतवार आणि विद्यार्थी उपस्थित होते. सौ. चंदाताई देवगडे, व प्रेम जरपोतवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Pages