🔰वल्ड वाॅकिंग डे निमित्य कार्यक्रमाचे आयोजन
खबरकट्टा /चंद्रपूर :
आजच्या धावपडीच्या जिवणात आपले आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र हे भविष्यासाठी धोकादायक आहे. सकाळी नियमित 45 मिनिटे चालने हे आरोग्यासाठी उत्तम औषध आहे. त्याच बरोबर निरोगी शरिरासाठी परंपरागत खेळांनाही नव्याने पुनर्जीवित करण्याची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
वल्ड वाॅकिंग डे निमित्य आज रविवारी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर, नेहरु युवा केंद्र, चंद्रपूर आणि असोसिएशन ऑफ स्पोट्स अँड फिटनेस फाॅर ऑल चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्येमाने गांधी चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात रेशी दुर्गराज एन रामटेके, एफईएस काॅलेजच्या मुख्यध्यापीका मोटघरे मॅडम, सरदार पटेल महाविद्यालयाच्या जुमडे मॅडम यांच्या सह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
योवेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, आजच्या व्यस्त जीवनात व्यायम प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. असे असले तरी आता अनेक जन माॅर्निग वाॅक करतांना दिसून येतात. सकाळी पायदळ चालल्याने शारिरिक सुदृढतेसह सकारत्मकता येते. त्यामूळ रोज सकाळी किमान ४५ मिनिटे पायदळ चालायला हवे, चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत होते. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते. यासह चालण्याचे अनेक फायदे असल्याचे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले. मात्र केवळ एका दिवसापूरती हे आयोजन करुन चालणार नाही तर हा उपक्रम वर्षभर नियमित राबविला गेला पाहिजेे असे आवाहनही यावेळी बोलतांना त्यांनी आयोजकांना केले. निरोगी शरिरासाठी खेळ हा सुध्दा उत्तम प्रकार आहे. मात्र आजच्या इंटरनेटच्या युगात मातीशी जूळलेल्या खेळांकडे तरुनपिढी पाठ फिरवत आहे. त्यामूळे हे खेळ पून्हा नव्याने पुनर्जीवित करण्याची गरजही याप्रसंगी त्यांनी बोलून दाखविली. यावेळी उपस्थित युवकांसह आमदार किशोर जोरगेवार यांनी पायदळ चालत नियमीत पायदळ चाला आणि निरोगी राहा असा संदेश दिला.