मानसिक आरोग्य सप्ताह निमित्य "मानसिक आरोग्यावर " प्रत्यक्ष व ऑनलाईन प्रबोधन कार्यक्रम संपन्न:#chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



मानसिक आरोग्य सप्ताह निमित्य "मानसिक आरोग्यावर " प्रत्यक्ष व ऑनलाईन प्रबोधन कार्यक्रम संपन्न:#chandrapur

Share This


खबरकट्टा /चंद्रपूर :


१० ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त समाजामध्ये मानसिक आरोग्याविषयी जागृकता पसरवण्याचा व मानसिक आरोग्यासाठी आवश्यक ती मदत पोहचवण्यासाठी या दिवसाचे आयोजन केले जाते.

यासाठी आज जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहा निमित्त एस आर एम कॉलेज ऑफ़ सोशल वर्क चंद्रपूर ,वैद्यकीय व मन:चिकित्सक समाजकार्य विभाग, चंद्रपुर , आय.एम.ए, रोटरी क्लब,स्मार्ट सिटी चंद्रपूर, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम आणि योग परिवार च्या सयुंक्त विद्यमाने 'मानसिक स्वास्थ राखू या' ऑनलाइन व प्रत्यक्ष कार्यक्रम आय एम ए हॉल येथे आयोजित करण्यात आले.

यावेळी सर्वश्री मा डॉ किरण देशपांडे , न्यायमूर्ति जाधव , गोपाल मुंधड़ा, डॉ जयश्री कापसे, डॉ देवेंद्र बोरकुटे , डॉ बनकर यांनी मानसिक आरोग्यावर प्रबोधन केले . यावेळी श्री शेंद्रे , डॉ अनूप पालीवाल प्रामुख्याने उपस्तिथ होते . एस आर एम कॉलेज चे विद्यार्थी व योगपरिवारच्या सदस्यांच्या उपस्तिथित हा कार्यक्रम पार पड़ला. कार्यक्रमाचे संचालन धनंजय तावाडे तर आभार डॉ देवेंद्र बोरकुटे यांनी केले.


Pages