चंद्रपूर मनपाच्या स्थायी समिती सभापती पदी नगरसेवक संदीप आवारी निर्विरोध:#sandip -awari - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपूर मनपाच्या स्थायी समिती सभापती पदी नगरसेवक संदीप आवारी निर्विरोध:#sandip -awari

Share This


खबरकट्टा /चंद्रपूर :

चंद्रपूर मनपाच्या स्थायी समिती सभापती पदी भाजपचे संदीप आवारी यांची निर्विरोध निवड करण्यात आली.10 ऑक्टोबरला 4 वाजेपर्यंत एकही फॉर्म न आल्याने संदीप आवारी हे निर्विरोध निवडणूक जिकंले. महिला व बालकल्याण समिती सभापती पदी भाजपच्या नगरसेविका पुष्पा उराडे व उप सभापती पदी शीतल आत्राम यांची निवड करण्यात आली आहे.

विवेक नगर प्रभागातून पालिकेच्या निवडणुकीत निर्वावाद वर्चस्व असेलेले संदीप आवारी यांनी चंद्रपूर मनपाचे उप महापौर म्हणून त्यांचा नावाची नोंद आहे.standing committee chairman चंद्रपूर मनपाचे मावळते स्थायी समिती सभापती रवी आसवाणी यांनी नव्या सभापतीचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.सोबतच महापौर राखी कंचर्लावार, उपमाहापौर राहूल पावडे यांनी सुद्धा नवे सभापती आवारी यांचे अभिनंदन केले.

        मनपाच्या सभापती पदासाठी 9 अर्जाची उचल झाली होती. मात्र वेळेवर एकही अर्ज आवारी यांच्या विरोधात आला नाही. मनपाचे नगरसेवक संदीप आवारी यांनी आपल्या यशाचे श्रेय माझी अर्थमंत्री महाराष्ट्राचे लोकलेखा समिती अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार व माझी केंद्रीय गृहराज्यमंत्री व भाजपचे ओबीसी विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहिर यांना भाजप नगरसेवक यांनी दिले आहे.

Pages