कुर्झा येथे शेषराव महाराज पुण्यतिथी साजरी:#bharhmpuri - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



कुर्झा येथे शेषराव महाराज पुण्यतिथी साजरी:#bharhmpuri

Share This


🔰:-व्यसनमुक्ती हेच आमच्या संघटनेचे ध्येय...... जिल्हा व्यसनमुक्ती संघटना अध्यक्ष अनिल डोंगरे याचे प्रतिपादन...

🔰:- ब्रम्हपुरी तालुक्यातील व्यसनमुक्ती होणाऱ्या दहा कार्यकर्त्यांचा सत्कार.....

खबरकट्टा /चंद्रपूर :भ्रह्मपुरी
काल दिनांक १० आक्टोबर ला प. पुज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना ब्रम्हपुरी यांच्या वतीने कुर्झा येथील हनुमान देवस्थान येथे २१ व्या पुण्यतिथी निमित्ताने महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी ब्रम्हपुरी च्या नगराध्यक्षा सौ. रिता उराडे, उपाध्यक्ष म्हणून व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष अनिल डोंगरे,व्यसनमुक्ती संघटना कोष्याध्यक्ष पंडित काळे, नगरसेवक विलास विखार, नगरसेविका सपना खेत्रे, बाबुराव भाजीपाले, बडोले महाराज, आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा सौ. रिता उराडे व्यसनमुक्ती चा ध्यास घेऊन शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना अनेक वर्षांपासून व्यसनमुक्ती कडे काम करत आहे. व्यसनाधीन होऊन अनेक संसार उद्ध्वस्त झाल्याचे मी माझ्या राजकीय कारकीर्दीत बघितले आहे. महीला व्यसनाधीन माणसामुळे त्रस्त झालेल्या बघायला मिळतात मला या संघटनेचे विचार मनात ठेवून जर मनुष्य हा व्यसनमुक्त होत आहे तर या संघटनेचे कार्य समाजात प्रेरणादायी आहेत असे आपल्या मनोगत व्यक्त केले.

तसेच अनिल डोंगरे व्यसनमुक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी व्यसनाला सहकार्य करणाऱ्यांना या संघटनेत कुठल्याही प्रकारचा थारा नसल्याचे स्पष्ट केले. व संघटनेच्या कार्यातुन संपूर्ण जिल्हा वेढलेले आहे. हे कार्य ज्या घरचे कुटुंब व्यसनाच्या आहारी गेले आहे. अशा लोकांच्या घरांघरां पर्यंत आपला कार्यकर्ते पोहोचले पाहिजे असे आपल्या रोखठोक मार्गदर्शनात व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी सुरेश जिफकाटे, रमेश विखार, दिवाकर कुर्झेकार, दिनेश कुंडुले, ज्ञानेश्वर काटेखाये, बंबी वैद्य, सचिन बिलोने, नंदाजी वैद्य, विलास टीकले, किशोर बावनकुळे, भाऊराव लाखे, दिपक उईके, नेपाल लाखे, मोहन विजकापे, देंवानंद बिलोने, संजय कंरबे आदींनी सहकार्य केले. आणि सदर कार्यक्रमात बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Pages