आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचनेनंतर नवीन मेडिकल कॉलेज येथे यंग चांदा ब्रिगेडचे मदत कार्य सुरु:#kishor -jorgewar - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचनेनंतर नवीन मेडिकल कॉलेज येथे यंग चांदा ब्रिगेडचे मदत कार्य सुरु:#kishor -jorgewar

Share This


🔰यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने अग्नीकांडातील पिडीत कामगारांच्या जेवनाची व राहण्याची व्यवस्था

खबरकट्टा / चंद्रपूर :


निर्माणाधीन मेडिकल कॉलेजच्या इमारतीला आग लागल्याने येथे काम करत असलेल्या हजारो कामगारांच्या राहण्याचा व भोजनाचा प्रश्न निर्माण झाला होता. याची तात्काळ दखल घेत येथील कामगारांना शक्य ती मदत करत त्यांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना केल्या होत्या. त्यानंतर रात्रीच यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले होते. काल पासूनच यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने येथे मदतकार्य सुरु करण्यात आले असून येथील कामगारांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

काल रात्रीच्या सुमारास निर्माणकार्य सुरू असलेल्या नवीन मेडिकल कॉलेजच्या इमारतीला अचानक आग लागली. त्यामूळे येथे काम करत असलेल्या कामगारांच्या जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहे. त्यामूळे कामगार मोठ्या अडचणीत सापडला होता. सर्व साधनसामुग्री जळल्याने त्यांच्या राहण्याचा व भोजनाचाही मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे येथील कामगारांना शक्य ती पूर्ण मदत करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना दिले होते. तसेच अडचणीत असलेल्या कामगारांच्या भोजनाची व राहण्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना केल्या होत्या. सूचना प्राप्त होताच रात्री यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल होत त्यांच्या वतीने मदत कार्य सुरू करण्यात आले होते. हे मदतकार्य आज दिवसभर सुरु राहिले या दरम्याण येथील कामगारांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. या मदतकार्यात यंग चांदा ब्रिगेडचे पंकज गुप्ता, राजेश वर्मा, परमाहंस यादव, अक्षय मिस्त्री, सुरेंद्र अंचल, शुभम जगताप, दिपक निखार, श्रीकिशन केवट, राकेश निरवटला, चंदभूषण पासे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे इतर कार्यकर्ते सहभागी झाले आहे.


Pages